प्राथमिक आरोग्य केंद्र,सांगरुण लसीकरण मोहिमेस भेट.

187

अतुल पवळे पुणे जिल्हा प्रतिनिधी
सांगरुण (ता.हवेली) : बुधवार,दि.०७ एप्रिल २०२१ – प्राथमिक आरोग्य केंद्र,सांगरुण अंतर्गत विविध गावात कोव्हिड-19 लसीकरण सुरु आहे.१५०० नागरिकांना सांगरुण आरोग्य केंद्रातर्गंत लस देण्यात आली आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्र,सांगरुण येथे लसीकरण मोहिमेला हर्षवर्धन दीपक मानकर यांनी भेट देऊन संबंधित डाॅ.अनिल जोशी व आरोग्य कर्मचारी यांच्याशी संवाद साधून लसीकरणांना बाबत योग्य मार्गदर्शन करुन व सूचना दिल्या व संपूर्ण आरोग्य केंद्राची पाहणी केली.

यावेळी शुक्राचार्य वांजळे (मा.उपाध्यक्ष,जिल्हा परिषद,पुणे),खुशाल करंजावणे,श्रीमती सिताबाई मानकर (मा.सरपंच,सांगरुण),नितिन धावडे (सरपंच,कोंढवे-धावडे),सचिन पायगुडे (सरपंच,मांडवी),महेंद्र गायकवाड (सरपंच,सांगरुण),विकी मानकर (उपसरपंच,सांगरुण),
तेजस राऊत (ग्रा.पं.सदस्य,सांगरुण),संदीप धोत्रे (ग्रामसेवक,सांगरुण),प्रविण जिंदम व इतर मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.