अतुल पवळे पुणे जिल्हा प्रतिनिधी
बुधवार दि.०७ एप्रिल २०२१ : बहुली (भगतवाडी) येथे १४ मार्च रोजी लागलेल्या आगीत सुमारे १६ कुटुंबाची घरे जळून खाक झाली होती.आज
दीपक माधवराव मानकर यांच्या वतीने त्या जळीतग्रस्त कुटुंबाना घरगुती जीवनावश्यक वस्तूची मदत करण्यात आली.
यावेळी हर्षवर्धन दीपक मानकर (संस्थापक,दीवा प्रतिष्ठाण,पुणे),शुक्राचार्य वांजळे (मा.उपाध्यक्ष,पुणे जिल्हा परिषद,पुणे),श्रीमती सिताबाई मानकर (मा.सरपंच,सांगरुण),बंडा भगत (उपसरपंच,बहुली),इतर मान्यवर,ग्रामस्थ व जळीतग्रस्त कुटुंब उपस्थित होते.