मिनी लॉकडाऊन त्वरीत रद्द करा अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाची मागणी

116

 

प्रतिनिधी/ तेजल झाडे

गडचिरोली, दि.२४ : राज्य शासनाने जाहीर केलेला मिनी लॉकडाऊन त्वरीत रद्द करण्यात यावा व सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यात यावा अशी मागणी अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाने केली आहे.
पक्षाच्या जिल्हा कार्यकारीणीची बैठक पक्षाचे केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत व जिल्हाध्यक्ष अशोक खंडारे यांच्या अध्यक्षतेखाली चांदेकर भवन येथे नुकतीच संपन्न झाली. त्या बैठकीत या मागणीचा प्रस्ताव मंजुर करण्यात आला.
शासनाने जाहीर केलेल्या मिनी लॉकडाऊनमुळे मजुर, शेतकरी, लहान व्यावसायीक, फुटपाथ दुकानदार, झोपडपट्टी व्यावसायीक यांचे आर्थिक उत्पन्न बंद होऊन त्यांचा उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण होईल. तसेच याचा परिणाम देशाच्या एकुणच अर्थव्यवस्थेवर होईल. मागील वर्षीच्या लॉकडाऊनमुळे आधीच बरेच लोक त्रस्त झाले असुन त्यातुन ते अद्यापही सावरले नाही. आणि आता नविन लॉकडाऊनमुळे त्यांचेवर गंभीर आर्थिक संकट कोसळणार आहे. त्यामुळे शासनाने हे मिनी लॉकडाऊन रद्द करावे अशी मागणी यावेळी पक्षातर्फे करण्यात आली.
या बैठकीला रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा सरचिटणीस हंसराज उंदिरवाडे, कार्यालयीन सचिव अशोक खोब्रागडे, महिला आघाडी जिल्हा सरचिटणीस ज्योती उंदिरवाडे, जिल्हा संघटक डॉ.अंकिता धाकडे, युवक आघाडी जिल्हाध्यक्ष नरेंद्र रायपुरे, जिल्ल्हा युवा सरचिटणीस पुण्यवान सोरते, शहर महिला आघाडी अध्यक्ष वनमाला झाडे, तालुका अध्यक्ष प्रल्हाद रायपुरे, सरचिटणीस माधुरी शंभरकर, तालुका संघटक हेमाजी सहारे, तालुका उपाध्यक्ष चिंतामन बांबोळे, प्रकाश गोवर्धन, शहर सरचिटणीस साईनाथ गोडबोले, भाऊराव थोरात, शली शेंडे, आर.एल.नैताम इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.