धम्मग्रंथ व पक्ष्यांना पाणिपात्राचे वाटप करुन केला वाढदिवस साजरा

70

 

अकोट प्रतिनिधी

लोहारी येथील नेहरु युवा बहुउदेशीय मंडळाचे अध्यक्ष सुशिल सपकाळ यांनी आपला वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करुन ध्म्मग्रंथ,धार्मिक पुस्तके व पक्षांना पाणीपात्र वाटप करुन साजरा करण्यात आला . लोहारी येथील नालंदा बहुउदेशीय संस्था व नेहरु युवा मंडळाचे दरवर्षी नविन नविन नाविन्यपुर्ण उपक्रम साजरे करत असतात त्यामधे सामान्य कुटुंबाला अर्थसहाय्य करणे,गरीब विद्यार्थ्यांना लेटर बुक पेन कंपासपेटी वाटप करणे, कपडे वाटप करणे, वृक्ष वाटप करुन वृक्ष लागवड करणे , असे मंडळाच्या सद्यस्यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम करत आहेत.त्यामधे असाच वाढदिवस कोरोनाचे नियम पाळत साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करत 50 धर्मग्रंथ, 30 धम्म पुस्तके,20 पक्ष्यांना पानिपात्र वाटप करण्यात आले यावेळी नेहरु युवा वहुउदेशीय मंडळाचे व नालंदा बहुउदेशीय संस्थेचे सर्वच सभासद उपस्थीत होते .