अबब…! एका टिल्लू चे ८० रुपये गांधीनगर-सावंगी गावात चौका-चौकात देशी-विदेशी दारूचा माहापूर गांधीनगर गावात किराणा दुकानांच्या आड चालतेय देशी-विदेशी दारूची भट्टी

423

 

पंकज चहांदे
तालुका प्रतिनिधी
दखल न्यूज भारत
मो.बा. ८३२९८०५३९९

सावंगी/गांधीनगर – देसाईगंज तालुक्यातील गांधीनगर गावात शिवाजी चौकात अवैधरीत्या मोठ्या प्रमाणात खुलेआम दारू विकल्या जात आहे. तर सावंगी गावात ग्रामपंचायत एरिया मध्ये व सावंगी मेंढा टोली येथे एका घरी व बस स्टाप येथे दारू विकल्या जात आहे. तर गांधीनगर येथील काही किराणा दुकानदार सकाळच्या सुमारास १० ते ११ वाजता किराणा दुकानातील सामान आणण्याच्या बहाण्याने रिकाम्या खताच्या थैली मध्ये तर विदेशी दारू बॉक्स मध्ये मोठ्या प्रमाणात तस्करी केल्या जात आहे. यामध्ये गांधीनगर येथील काही २-४ होलसेल किराणा दुकानदार जीवनावश्यक घरउपयोगी सामानांच्या व सकाळी-सायंकाळी नास्त्याच्या आड देशी व विदेशी दारूची विक्री करीत आहेत. तर सावंगी येथील सावंगी मेंढा टोली येथील दारू विक्रेता दोन चाकी वाहनाने सावंगी गावात येथे पार्सल स्वरुपात देशी विदेशी दारू पोहोचती करतोय. तर ग्रामपंचायत सावंगी येरिया मध्ये सदर दारू विक्रेता चक्क आपल्या घरी दारू विकतोय. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव थांबविण्याकरिता शासनाकडून नवीन नियमावली घोषित करण्यात आली असताना सुद्धा गांधीनगर-सावंगी गावात मोठ्या प्रमाणात देशी दारू ८० रुपये एक टिल्लू तर विदेशी दारू ३०० ते ३५० रुपये याप्रमाणे विकल्या जात असल्याची व सायंकाळी शिवाजी चौकात जमाव होत असल्याने जमाबंदी ची धज्जीया उडत असल्याचे जनमाणसाकडून दबक्या आवाजात सांगितल्या जात आहे. काही दुकानदार दारूचे विक्रेते व सप्लायर बनले असल्याचे सांगण्यात येत आहे. काही गांधीनगर येथील नामवंत लोकांनी शिवाजी चौकात तर हनुमान मंदिरा जवळ व गांधीनगर प्राथमिक शाळेच्या वालकंपाउंड च्या बाजूला या अवैध धंद्याला सुरु केले असल्याचे बोलल्या जात आहे. गांधीनगर-सावंगी गावातूनच तालुक्याच्या ठिकाणी व जिल्ह्यात दारू तस्करी केल्या जात असल्याचेही बोलल्या जात आहे. गांधीनगर-सावंगी या गावात गट ग्रामपंचायत होती त्या वेळेस तंटामुक्त समितीने पुढाकार घेऊन दोन्ही गावात दारू विक्री बंद केलेली होती. व ज्यांच्याकडे दारू मिळेल त्यांच्याकडून दंड वसूल केल्या जात होते. पण समिती बरखास्त झाल्यामुळे दोन्ही गावातील ग्रामपंचायत वेगवेगळी झाल्यामुळे जुने दोन्ही गावातील ग्रामपंचायत सदस्य याकडे लक्ष देत नसल्याचे जनमाणसात दबक्या आवाजात बोलल्या जात आहे. गांधीनगर गावात यापूर्वी पोलीस पथकाने धाड टाकून सुद्धा या अवैध देशी दारू विक्रेते व दुकानदारांवर काहीही कार्यवाही केलेली नसल्याचेही ग्रामस्थांकडून दबक्या आवाजात बोलल्या जात आहे.