साकोली शहरात सि-६० पोलीसांचा फ्लैग रूटमार्च दिला साकोली पोलीस स्टेशन कडून कोरोना काळात कडक नियम पाळा संदेश

96

 

सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी भंडारा-ऋग्वेद येवले

साकोली : शहरात साकोली व लाखनी पोलीस सि – ६० पथक व नगरपरीषद वतीने कोरोना काळात शासकीय नियमांचे पालन करावे यासाठी शहरातून फ्लैग रूटमार्च (०७ एप्रिल) ला काढण्यात येऊन जनतेला नियम व शिस्तपणांचे वचक प्रदर्शन करण्यात आले.
सदर रूटमार्च पोलीस ठाणे – महामार्ग – एकोडी चौक – एसबीआय बैंक चौक – नागझिरा रोड – बसस्थानक परीसर – परत वनविभाग मार्ग – नगरपरीषद कार्यालय चौक – होमगार्ड परेड मार्ग – गणेश वार्ड – न्यायालय मार्ग – लाखांदूर रोड ते पोलीस ठाणे असा असून संपूर्ण शहरातून रूटमार्चने जनतेला कोरोना काळात शासकीय नियमांचे पालन करावे, अनावश्यक जमावगर्दी टाळावी, मास्कचा नियमित वापर करण्यासाठी संदेश देण्यात आला. या फ्लैग रूटमार्चचे नेतृत्व उपविभागीय अधिकारी मनिषा दांडगे, तहसिलदार रमेश कुंभरे, पोलीस ठाणे साकोली निरीक्षक जितेंद्र बोरकर, पोलीस ठाणे लाखनी निरीक्षक मनोज वाढीवे, साकोली पोलीस सहा. निरीक्षक तेजस सावंत, पोलीस उपनिरीक्षक धनंजय कुळकर्णी, पोलीस उपनिरीक्षक कमलसिंह सुर्यवंशी यांसह पोलीस सि-६० पथक, नगरपरीषद कर्मचारी स्वप्निल हमाने, पत्रकार संघ साकोलीचे आशिष चेडगे आणि सर्व पोलीस ठाणे साकोली कर्मचारी, नगरपरीषद कर्मचारी या फ्लैग रूटमार्चला शहरभ्रमणात हजर होते.