आशा वर्कर कर्मचाऱ्यांचा मनपा कार्यालया समोर तीव्र निदर्शने. कोरोणा काळातील जानेवारी पासून थकीत मासिक चार हजार रुपये प्रोत्साहन पर भत्ता अदा करण्याची मागणी.अन्यथा 12 एप्रिल पासून मनपा कार्यालयात मुक्कामी ठिय्या आंदोलन छेडण्याचा आय टक चा इशारा.

0
70

 

ऋषी सहारे
संपादक

चंद्रपूर:- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महानगर पालिका स्तरावर काम करणाऱ्या आशा वर्कर यांना जानेवारी पासून चा थकीत मासिक चार हजार रुपये प्रोत्साहन पर भत्ता पूर्ववत सुरू करण्यात यावा व इतरही प्रलंबित मागण्यासाठी आय टक चे राज्य सचिव कॉ.विनोद झोडगे यांच्या नेतृत्वात मनपा कार्यालया समोर तीव्र निदर्शने करून महापौर मॅडम, आयुक्त, उपायुक्त व वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली.
मनपा स्तरावर सर्व आशा वर्कर लोकांमध्ये जनजागृती ,आरोग्याची काळजी घेणे,महा आयुष सर्वे करणे, कोविड-19 शी निगडित इतर कामे अहोरात्र मेहनत घेऊन जीवाची पर्वा न करता करीत आहेत.सदर बाबी हया कामाचा भाग असल्या तरी देखील हे कर्मचारी आपल्या जीवाची जोखीम पत्करून ही कामे करीत असल्याने त्यांना मिळणाऱ्या मानधन व्यतिरिक्त चार हजार रुपये प्रोत्साहन पर भत्ता आगस्त ते डिसेंबर 2020 पर्यंत अदा करण्यात आला आणि जानेवारी पासून पुढे देण्यास मनपा प्रशासन चाल ढकल करीत आहे.सध्या कोविड मूळे सर्व आशा वर्कर ला मूळ काम करता येत नाही आणि सध्या फक्त कोविड सर्वेक्षण व त्या अनुषंगाने ईतर सर्व कामे त्यांच्यावर बळजबरीने लादत असल्याने त्यांची आर्थिक कोंडी होत आहे.चंद्रपूर शहर मध्ये कोविड-19 अनुषंगाने अनेक कामे दररोज 8 ते 9 तास सर्व आशा वर्कर करीत आहेत तेव्हा त्यांना तातडीने जानेवारी पासून चा थकीत चार हजार रुपये प्रोत्साहन पर भत्ता अदा करण्यात यावे तसेच माझे कुटुंब माझी जबाबदारी अंतर्गत करण्यात आलेल्या सर्वेक्षणाचे अनेक आशा वर्कर ला मोबदला मिळाला नाही तर काही आशाना कामे करूनही कमी मोबदला मिळाला तेव्हा हा थकीत मोबदला प्रतिदिन 150 रू.प्रमाणे तातडीने अदा करण्यात यावे.सर्व आशा वर्कर ला सन्मानाची वागणूक देण्यात यावी.नियमित केलेल्या कामाचा थकीत मोबदला त्वरित देण्यात यावा व या पुढे दर महिन्याच्या 1 तारखेला आशांच्या बँक खात्यात मोबदला जमा करण्यात यावा.राज्य सरकारने वाढवून दिलेले नोव्हेंबर महिन्या पासूनचे थकीत मासिक दोन हजार रुपये मानधन वाढ त्वरित देण्यात यावी. कोविड सेंटरला आशा वर्कर ची काही झोनला बळजबरीने ड्युटी लावण्याचा प्रयत्न होत आहे ते त्वरित थांबविण्यात यावा.झोन न.4 ची श्रीमती वर्षा सातपुते सिस्टर आशा वर्कर ला उद्धट वागणूक देऊन मानसिक व शारीरिक त्रास देतात तसेच काही आशांन च्या अंगावर धावून हात उगरण्याचा प्रयत्न केला आहे तेव्हा अशा मुजोर सिस्टर ला तातडीने निलंबित करण्यात यावे किंवा दुसरीकडे बदली करण्यात यावी.जेणेकरून त्यांचा कोणत्याही आशा वर्कर सोबत संपर्क होता कामा नये. संदर्भ क्र.7/34/2021 दि.31/3/2021 च्या मनपा कार्यालयाने काढलेल्या पत्रा नुसार आशा वर्करला अनेक कामे करण्याची सक्ती लादण्यात आली आहे व जाचक अटी शर्ती पण आहेत आणि त्या नुसार कामे केली नाही तर 1500/-रू.चे वाऊचर देणार नाही अशी धमकी देण्यात आली आहे तेव्हा संदर्भिय पत्र तातडीने रद्द करून आशांना योग्य वागणूक देण्यात यावी.मागील वर्षी फरवरी 2020 मध्ये काही नवीन आशा वर्कर नियुक्त करण्यात आले आणि त्यांच्या कडून सर्व काम 7 महिने नियमित करवून घेण्यात आले परंतु कामावरील मोबदला मात्र तुमची ट्रेनिंग झाली नाही म्हणून देता येणार नाही असे सांगितल्या जात आहे,तेव्हा ट्रेनिंग न होता सर्व कामे करवून घेणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पगारातून सबंधित आशांना मोबदला अदा करण्यात यावा किंवा त्यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी.काही झोन मध्ये आशा वर्कर सर्व कामे करीत असताना जर त्यांच्या कार्य शेत्रात गरोदर मातेची केस मिळाली नाही तर त्यांना त्या महिन्यात अहवाल वाउचर दिल्या जात नाही त्यामुळे सबंधित आशा वर्कर ला वाढीव मानधन पासून वंचित राहावे लागते तेव्हा ही अट रद्द करण्यात यावी. यासह अनेक मागण्या विषही चर्चा करण्यात आली.परंतु योग्य तोडगा न निघाल्याने संघटनेच्या वतीने येत्या 12 एप्रिल 2021 पासून बेमुदत कामबंद आंदोलन व मनपा कार्यालयात मुक्कामी ठिय्या आंदोलन छेडण्याचा इशारा आय टक चे राज्य सचिव कॉ.विनोद झोडगे, भाकप नेते प्रा.नामदेव कनाके,संयुक्त खदान मजदुर संघाचे नेते कॉ.प्रदीप चीताडे,आशा वर्कर संघटनेच्या शहर अध्यक्ष वैशाली जुप्पाका,सचिव प्रतिमा कायारकर,सविता गटलेवार,सुकेषणी शंभरकर सह शहरातील सर्व आशा वर्कर उपस्थित होत्या.