आणि……तीन लग्नांचे वऱ्हाड पोहचले पोलीस ठाण्यात !

गोंदिया जिल्ह्यात तीन ठिकाणी गुन्हे दाखल

0
312

 

हर्ष साखरे विभागीय प्रतिनिधी

गोंदिया : शहर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या भीमघाट स्मारक समिती ग्राऊंड चुलोद रोड , गोंदिया येथे एप्रिल रोजी दुपारी १.४५ वाजता लग्न समारंभाचे आयोजन करण्यात आले . त्या लग्नात २०० वहाडी असल्याने या लग्न समारंभाचे आयोजन करणाऱ्या लोकांवर गोंदिया शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे . जिल्ह्यात वेगवेगळ्यात तीन घटनांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत . संसर्गजन्य कोरोना रोगाची लागण होत आहे . यासाठी गर्दी करू नये , असे जिल्हा प्रशासनाने आदेश दिले असतानाही भीमघाट स्मारक समिती ग्राऊंडवर आयोजित लग्न समारंभात २०० व्हराडी लोक होते . त्यांनी मास्कचा वापर केला नाही किंवा शारीरिक अंतर ठेवले नव्हते . त्यामुळे गोंदिया शहर पोलिसांनी कारवाई केली आहे . लग्न समारंभ आयोजन करणान्यांवर भादंविच्या कलम १८८,२६ ९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.तपास पोलीसनायक मानपीट करत आहेत.

👉 वहाड्यांची गर्दी , गुन्हा दाखल

चिचगड पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या वासनी येथील एका लग्नात ४ एप्रिल रोजी रात्री ८.३० वाजता गर्दी करण्यात आली . या लग्न समारंभात कोरोना ठाण्यांतर्गत विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कसल्याही उपाययोजना करण्यात आल्या नाही ग्राऊंड त्यामुळे चिचगड पोलीस संदीप मुरलीधर तुलावी ( ३५ ) यांच्या तक्रारीवरून चिचगड रोजी पोलिसांनी भादविच्या कलम १८८.२६ ९ .२७० अन्वये गुन्हा दाखल केला आहे .