आचार्य कुळाचे संस्थापक परम पूज्य मामा क्षीरसागर यांचा स्मृती दिवस साजरा…

0
26

 

रोहन आदेवार
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ

वणी:महापुरुष विचार प्रचार प्रसार व स्मारक संवर्धन समितीचे वतीने यवतमाळ रोड वरील रामदेवबाबा मंदिर परिसर स्थित आचार्य कुलाचे संस्थापक प.पू.मामा क्षीरसागर यांच्या स्मृतिदिनाचे अनुषंगाने त्यांच्या पुतळ्याला पाण्याने स्वच्छ धुवून हारार्पण व फुलार्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी समितीचे मार्गदर्शक कुंतलेश्वर तुरविले,समितीचे संघटक कासार सागर मुने, जागृत पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप बेसरकर, समितीचे समन्वयक लोकसेवक अमित उपाध्ये, युवा नेते इजिनियर चैतन्य तुरविले ,रामदेवबाबा मूक बधिर संस्थेचे मरकड सर हजर होते.