डॉक्टरवर जिवघेना हल्ला करणाऱ्या ‘त्या’ चारही आरोपींना दोन दिवसाचा पीसीआर

0
85

 

विशाल ठोंबरे
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी

शहरातील प्रसिद्ध डॉ. मत्ते यांच्यावर सोमवारी दुपारी १ वाजताच्या दरम्यान काही तरुनांनी धारदार शस्त्रााने जिवघेणा हल्ला करून फरार झाले होते. मात्र पोलिसांनी फरार आरोपींचा पाढलाग करुन काही तासातच अटक करून बेड्या ठोकल्या, यामध्ये अमर हनुमान पेंदोर रा. रंगनाथ नगर वणी, शुभम ओमप्रकाश खंडारे वास्तू पार्क लालगुडा, सुप्रीम मिलिंद उमरे भालर वसाहत, प्रज्योत महेश उपरे तेली फैल वणी असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या चारही आरोपींना आज मंगळवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
सविस्तर असे की, वणी शहरातील रामपूरा वार्डातील निवासस्थानी दवाखाना असलेले डॉ.पद्माकर मत्ते हे सोमवारी दिनांक ५ एप्रिल रोजी दुपारी आपल्या दवाखान्यात रुग्ण तपासणी करीत होते.दरम्यान १ वाजताच्या दरम्यान तिथे अमर पेंदोर हा रुग्ण म्हणून त्याच्या सहका-यांना सोबत आला व त्यांनी धारदार शस्त्रााने डॉ. पद्माकर मत्ते यांच्यावर सपासप वार केले. यावेळी दवाखान्याजवळ असलेल्या मेडिकल मधिल एका मजुराने आरडा ओरड केली असता डॉ. मत्ते यांच्या सुनबाई धावत आल्या आणि आरोपींना न घाबरता सासरे डॉ.मत्ते यांचे प्राण वाचवले असुन सद्या नागपुर येथे एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे.