पोंभुर्णा प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा द्या – राजु झोडे धरणे आंदोलनातून उलगुलान संघटनेचे तहसीलदारांना निवेदन

85

 

दख़ल न्यूज़ भारत:शंकर महाकाली

पोंभुर्णा(चंद्रपूर) : पोंभूर्णा तालूका हा भौगोलीक नकाशा पाहता क्षेत्रफळाने विस्तारलेला आहे. शेवटच्या गावाचे टोक जवळपास ३० ते ३५ किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणी उपचाराकरीता खेड्या पाड्यातून नागरीक येत असतात परंतू येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असल्याने त्यांना रेफर टू चा सामना करावा लागत आहे. अनेक असुविधा मुळे
नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे पोंभूर्णा प्राथमिक आरोग्य
केंद्राला ग्रामिण रूग्नालयाचा दर्जा देऊन येथे महीला रोग तज्ञ, अस्ती रोग तज्ञ, बालरोग तज्ञ व ईतर डॉक्टरांची नागरीकांच्या सेवेसाठी २४ तास उपलब्धता करावी.
मागील अनेक वर्षापासून विवीध समस्यांच्या विळख्यात सापडलेले
प्राथमिक आरोग्य केंद्र सध्या सलाईनवर असून, येथे आरोग्याची व्यवस्था शेवटची
घटका मोजत आहे. या केंद्रात अनेक सुविधांचा अभाव आहे. अनेक अव्यस्था व अस्वच्छता निर्माण झाली आहे. त्यामुळे येथील नागरीकांना आरोग्याच्या अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असून, नागरीकांना आपल्या आरोग्याशी खेळ
खेळला जावा लागतो आहे. त्यामुळे पोंभूर्णा प्राथमिक आरोग्य केंद्राला ताबडतोब प्रामिण रूग्नालयाचा दर्जा देऊन बाल रोग तज्ञ, महीला रोग तज्ञ, अस्थि रोग तज्ञ अशा इतर डॉक्टरांसह २४ तास डॉक्टर उपलब्ध करावे व सोनोग्रॉफी मशिन, एक्सेरे
मशिन व सुसज्य लॅब तयार करून तज्ञ पॅथॉलाजीस्ट उपलब्ध करावे आणि मागील अनेक दिवसापासून येथे मर्पूरी शविच्छेदन गृह असून, सुद्धा येथील प्रशासनाच्या हलगरजी व बेजबाबदारपणामुळे माणूस मृत झाल्यानंतरही त्यांचा शविच्छेदन होत नसल्याने मृत प्रेताचा अवमान सुद्धा होत आहे.
अशा गैरसोयीमुळे शविच्छेदनाकरीता तालूक्यापासून जवळपास ५० किलोमिटर अंतरावर शव घेऊन जावे लागते आहे. त्यामूळे याचा नाहक त्रास व आर्थिक
भुर्दड नागरीकांना सहन करावा लागत आहे व त्याच बरोबर प्राथमिक आरोग्य
केंद्रात औषध व गोळ्यांचा तुटवडा नेहमीच होत असल्याने तो त्वरीत दुर करावा.
वरील सर्व मागण्या त्वरीत सोडवून नागरीकांना सोयी सुविधा उपलब्ध कराव्यात.
या करीता उलगुलान संघटनेच्या वतीने धरणा आंदोलनाच्या
माध्यमातून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. पोंभूर्णा प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामिण
रूग्नालयाचा दर्जा देऊन होत असलेल्या असुविधा व गैरसोयी ताबडतोब निकाली
काढाव्यात अन्यथा या नंतरही आपले शासन व प्रशासना विरोधात तिव्र आंदोलन
करण्यात येईल. असा इशारा उलगुलान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजु झोडे, रुपेश निमसरकार, तालुका अध्यक्ष अंशुल मोरे, महासचिव किशोर केमेकार, उपाध्यक्ष हिम्मतलाल मांडवगडे, उपाध्यक्ष नितेश रामटेके, सचिव अमीन मेश्राम, बालु कावरे, शुभम वडेट्टीवार, नरेश कोवे,प्रणय राउत, शुभम कुळमेथे, देवाजी देवगडे, भाऊराव रामटेके, अशोक सिडाम, रोशन ढोंगे, रामचंद्र आत्राम, गुरुदास मेश्राम, मिठाईलाल बांबोळे, राकेश मेश्राम आदी असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.