मारेगावच्या कोविड सेन्टरमधून पॉझिटीव्ह रुग्ण पळाला…

180

मारेगाव तालुका प्रतिनिधी
श्रीधर सिडाम
मारेगाव येथील कोविड केंद्रामध्ये असलेल्या एका पॉझिटीव्ह रुग्णाने पहाटेच्या वेळेस पळ काढल्याने प्रशासकीय यंत्रणे बरोबर,तालुक्यातील नागरिकात खळबळ उडाली असुन,रुग्ण पॉझिटीव्ह असल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली आहे.
मारेगाव तालुक्यातील पहिला पॉझिटीव्ह रुग्ण असलेल्या कुंभा येथील व्यक्तीला मारेगाव येथील पुरके आश्रम शाळेमध्ये क्वाॅरनटाईन ठेवण्यात आले होते. त्याच्यासोबत इतर 36 व्यक्तीही येथे कॉरंटाईन होत्या.पहाटे 5 वाजतेच्या दरम्यान वॉशरूमच्या नावाखाली तो गेला आणि तेथूनच गायब झाला.
गायब झाल्याचे वृत्त कळताच सर्व स्तरावर खळबळ उडाली असून प्रशासन खडबडून जागे झाले आहे.माहिती मिळताच पोलीस निरीक्षक,पोलिस उपनिरीक्षक,तहसीलदार,तालुका आरोग्याधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली व रुग्णाची शोधाशोध सुरू केली.
आता पर्यंत पॉझिटीव्ह रुग्णाचा कोणताही पत्ता लागलेला नव्हता.मारेगाव येथील पुरके आश्रम शाळेमध्ये करण्यात आलेल्या या कोविड केंद्राला अनेक रस्ते आहेत.हॉलच्या बाजूलाच खुली जागा असल्याने या रुग्णांना पळण्यासाठी अनेक वाटा आहेत.अशातच येथे ड्युटीवर असलेल्या आरोग्य कर्मचारी,होमगार्ड यांची तेथे ड्युटी होती तर मुख्य प्रवेशद्वारावर पोलिसांची ड्युटी होती. वॉशरूमच्या नावाखाली बाथरूमकडे गेलेला रुग्ण परत न आल्याने,सदर रुग्णाची शोधाशोध सुरु आहे.