वासाळा दारूविक्रेत्याच्या घरून 27 लिटर दारू पोलिसांनी केले जप्त

पोलिसांनी केला गुन्हा दाखल

149

 

देवानंद जांभूळकर जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली

आरमोरी : तालुक्यातील वासाळा येथे अवैध दारूविक्री सुरू असल्याची माहिती मिळताच आरमोरी पोलिस व मुक्तिपथ तालुका चमूने संयुक्त कारवाई करीत एका विक्रेत्याच्या घरातून 27 देशी दारूच्या निपा जप्त केल्या. याप्रकरणी संदीप गजभिये या दारूविक्रेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील वासाळा येथे 10 ते 12 दारूविक्रेते सक्रिय आहेत. वारंवार सूचना करूनही न जुमानता येथील दारूविक्रेते आपला अवैध व्यवसाय करीत आहेत. यामुळे आरमोरी पोलिस व मुक्तिपथने संयुक्तरित्या मोहीम हाती घेतली. त्यानुसार गावातील एका विक्रेत्याच्या घराची तपासणी केली असता त्याच्याकडून 27 देशी दारूच्या निपा जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी विक्रेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार घोडाम व बडे यांनी केली. यावेळी पोलिस पाटील अरविंद शेंडे, तालुका संघटक निलम हरिणखेडे उपस्थित होत्या.
दुसरी कारवाई गावातील एका महिला दारूविक्रेत्याविरोधात करण्यात आली. तिच्या घरातून दोन लीटर मोहफुलाची दारू जप्त करून नष्ट करण्यात आली. पुन्हा दारू विक्री करणार नाही अशी हमी या महिलेने दिली आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे गावातील अवैध विक्रेते धास्तावले आहेत.