चौल रेवदंडा परिसरात निसर्ग वादळाने वनसंपदा घटली, परिणामी उष्णतेची तीव्र झळ!

111

 

(प्रतिनिधी : चौल अलिबाग-मिथुन वैद्य)

अलिबाग : चौल, रेवदंडा परिसरात उष्णतेची तीव्र झळ बसत असून परिसरात उन्हाळ्यात ह्या आधी  इतकी उष्णतेची झळ बसत न्हवती मात्र यंदा एप्रिलच्या सुरूवातीस परिसरात तीव्र उष्णता जाणवत आहे. चौल, रेवदंडा विभागात असंख्य नारळी ,पोफळीच्या बागायती आहेत नैसर्गिक सौंदर्याने चौल, रेवदंडा ही गावे नटली आहेत. परिणामी उन्हाळ्यात येथील विभागात इतर भागाच्या तूलनेने उष्णता कमी जाणवत असे.
मात्र जून महिन्यात होऊन गेलेले निसर्ग चक्रीवादळाने येथील परिसरातील  नारळपोफळी,बागायतीच्या बागायती अक्षरशः जमिनदोस्त झाल्या परिसरातील  झाडाच्या बनात लपलेले छानशी कौलारु घरे आता मोकळी – मोकळी दिसत आहेत.
निसर्ग ने धारण केले रैद्र त्याचे तीव्र पडसाद आता जाणवत आहेत. परिसरात झाडाची मोठी पडझड झाल्याने उष्णतेची झळ बसत आहे. परिणामी चौल रेवदंडा परिसरातील नागरिक उष्णतेने ऐन एप्रिल महिन्यातच त्रस्त झाले आहेत.

*दखल न्यूज भारत.*