अखेर ,डॉक्टरवर हल्ला करणाऱ्या आरोपींना अटक, वणी पोलिसांची काही तासातच कारवाई हल्ल्याच्या निषेधार्थ आज दवाखाने बंद

0
87

 

विशाल ठोंबरे
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी

सोमवारी दुपारी १ वाजताच्या दरम्यान धारदार शस्त्रााने मत्ते डॉक्टरवर जिवघेणा हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात डॉक्टर गंभीर जखमी झाले होते. एका डॉक्टरवर पूर्ववैमनस्यातून हल्ला झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी अमर हनुमान पेंदोर रा. रंगनाथ नगर वणी, शुभम ओमप्रकाश खंडारे वास्तू पार्क लालगुडा, सुप्रीम मिलिंद उमरे भालर वसाहत, प्रज्योत महेश उपरे तेली फैल वणी असे अटक करण्यात आलेल्या हल्ल्यातील आरोपींची नावे आहेत.
डॉक्टरच्या हलगर्जीपणामूळे भावाचा मृत्यू झाला, असा लेखी आरोप हल्ल्यातील मुख्य आरोपी अमर पेंदोर यांनी केला होता. भावाचा बदला घेण्याच्या उद्देशाने हा कट रचून डॉक्टरवर निर्घृण हल्ला केल्याचे समोर आले आहे.
सविस्तर असे की, डॉ.पद्माकर मत्ते सोमवारी दिनांक ५ एप्रिल रोजी दुपारी ते आपल्या दवाखान्यात रुग्ण तपासणी करीत होते.१ वाजताच्या दरम्यान तिथे अमर पेंदोर हा रुग्ण म्हणून त्याच्या सहका-यांना सोबत घेऊन दवाखान्यात आला. दरम्यान डॉ. मत्ते हे रुग्ण तपासणीसाठी कॅबिनमध्ये बसून होते.यावेळी तिघेही आत शिरले. त्यातील दोघांकडे गुप्ती होती. त्यांनी गुप्तीने डॉ. पद्माकर मत्ते यांच्यावर सपासप वार केले. यात ते गंभीर जखमी झाले.
दरम्यान डॉ. मत्ते यांच्यावर हल्ला झाल्याची बातमी संपूर्ण शहरात वा-यासारखी पसरली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाणेदार वैभव जाधव देखील आपल्या पथकासह घटनास्थळी पोहोचले. डॉ. मत्ते हे कॅबिनमध्ये रक्तबंबाळ अवस्थेत पडून होते. त्यांच्या मुलाने दवाखान्यातील कर्मचा-यांच्या मदतीने त्यांना शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नागपूर येथे गेटवेल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली.
पोलिसांनी एका तासात प्रकरणाचा उलगडा करीत आरोपींना भालर मोक्षधाम येथे अटक केली.
दरम्यान या हल्ल्याची लिंक आधीच्या प्रकरणाशी असल्याचा त्यांना संशय होता. त्यावरून त्यांनी त्या दिशेने तपास करण्यास सुरुवात केली. त्यांना सदर आरोपी हे भालर येथे असल्याची माहिती मिळाली. पोलिसांचे पथक तात्काळ त्या ठिकाणी गेले व तिथून त्यांनी चारही आरोपींना अटक केली. ठाणेदार वैभव जाधव यांनी चारही आरोपिं विरोधात भांदंवी ३०७ (३४)अन्वये गुन्हा नोंद केला असून पुढील तपास सुरू आहे.

यासंदर्भात मुलाच्या भावाने अमर हनुमान पेंदोर यांनी तालुका वैद्यकिय अधिकारी तसेच उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन मृत्यूची उच्चस्तरीय चौकशी करून पोस्टमार्टेम रिपोर्ट फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठवून तपासणी करावी व माझे भावाचा जीव डॉ पद्माकर मत्ते मुळे गेल्याने त्यांचेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली होती, याबाबत चौकशी सुरू आहे.

डॉ.पद्माकर मत्ते यांच्या वरिल जिवघेन्या हल्ल्यासंबंधी आज वणी डॉक्टर असोसिएशनची मिटींग घेण्यात आली या
मिटींग मध्ये भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी मंगळवारी दिनांक ६ मार्च रोजी वणीतील सर्व दवाखाने बंद ठेवण्यात येतील अशी माहिती मिळाली आहे.