कोरोना रोखण्यासाठी खेड पोलिसांची जनजागृती मोहीम

212

 

प्रतिनिधी : प्रसाद गांधी.

खेड : सध्या संपूर्ण भारत देशात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढलेला आहे. खेड तालुक्यात देखील कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत.
महाराष्ट्र शासनाने कोरोना वर प्रतिबंध करण्यासाठी काही कठोर निर्बंधांची आजपासून अंमलबजावणी सुरू केलेली आहे.
त्यासंदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी खेड पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कदम यांनी खेड शहरातील बाजारपेठेत तसेच प्रत्येक चौकात फिरून नागरिकांना मार्गदर्शन केले.
पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कदम यांनी नागरिकांना मास्कचा वापर करणे, सोशल डिस्टंसिंग चे पालन करणे, वारंवार हात धुणे तसेच शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करणे याचे महत्व समजावून सांगितले.

*दखल न्यूज भारत.*