बेपत्ता जवान 1नक्षलवादयांच्या ताब्यात…. सुटकेसाठी मात्र ठेवली हे अट

435

हर्ष साखरे विभागीय प्रतिनिधी नागपूर

रायपूर : छत्तीसगडच्या बीजापूर भागात माओवाद्यांशी झालेल्या चकमकीनंतर सुरक्षा दलाचा एक जवान बेपत्ता होता. हा बेपत्ता जवान आपल्या ताब्यात असल्याचा दावा माओवाद्यांनी मीडियाच्या माध्यमातून केला आहे. माओवाद्यांनी काही स्थानिक मीडिया कर्मचाऱ्यांना फोन करून जवानाच्या सुटकेसाठी एक अट समोर ठेवली आहे. आपण जवानाला कोणत्याही प्रकारे हानी पोहचवणार नसल्याचे आश्वासनही माओवाद्यांनी यावेळी दिले आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीआरपीएफच्या कोब्रा बटालियनचा एक जवान बेपत्ता आहे. या बेपत्ता जवानाचे नाव राजेश्वर सिंह मनहास असे आहे. राजेश्वर हे जम्मू काश्मीरचे रहिवासी आहेत. माओवाद्यांनी स्थानिक पत्रकारांना फोन करून राजेश्वर यांना सोडण्यासाठी आपण तयार असल्याचे म्हटले. परंतु, सुटकेनंतर ते सुरक्षा दलात कार्यरत राहणार नाहीत तसेच ही नोकरी सोडून ते इतर दुसरे कोणतेही काम करतील, ही अट त्यांनी मान्य करण्याची अट माओवाद्यांनी समोर ठेवली आहे. दुसरीकडे, राजेश्वर सिंह यांच्या कुटुंबीयांनी छत्तीसगड सरकारकडे आपल्या पतीच्या सुखरुप सुटकेची मागणी केली आहे. नक्षलवाद्यांची जी मागणी असेल ती पूर्ण करून आपल्या पतीची सुटका करण्यात यावी, असे राजेश्वर यांच्या पत्नीने म्हटले आहे. राजेश्वर यांच्या पिताही सीआरपीएफमध्ये तैनात असताना देशासाठी शहीद झाले होते. राजेश्वर यांच्या कुटुंबात त्यांची आई, पत्नी आणि एक लहानगी मुलगी यांचा समावेश आहे. राजेश्वर यांची त्यांच्या कुटुंबाशी शेवटचे संभाषण शुक्रवारी रात्री ९.०० वाजता झालं होतं. त्यावेळी त्यांनी आपण ऑपरेशनवर जात असल्याचे म्हटले होते. परंतु, त्यानंतर त्यांचा संपर्क होऊ शकलेला नाही.
बस्तर क्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुंदरराज पी यांनी दिलेल्या माहितीनुसार, माओवाद्यांशी चकमकीनंतर घटनास्थळावरून जिल्हा राखीव रक्षक दलाच्या आठ, केंद्रीय राखील पोलीस दलाच्या कोब्रा बटालियनच्या सात, केंद्रीय राखील पोलीस दलाच्या बस्तरिया बटालियनच्या एका तसेच स्पेशल टास्क फोर्सच्या सहा जवानांचे मृतदेह आढळले. या वायुसेनेच्या मदतीनं शहीद जवानांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. तर जखमी जवानांनी रायपूरच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.