सावली तालुका महाराष्ट्र राज्य मराठीपत्रकार संघातर्फे कोरोना योद्धाचा सत्कार… — पोलीस प्रशासनाला केले सॅनिटायझर सयंचलीत मशीनचे वितरण..

110

भगवंत पोपटे
उपसंपादक
करण्यासारख्या वैश्विक महामारीत आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडत असताना कायदा-सुव्यवस्था व नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी घेत पाथरी पोलीसनी 144 कलम अंतर्गत जमाबंदी ,सोशल डिस्टंसिंग, बाबत व बाजार पेठेत खबरदारी घेत कोरोना बाबत जनजागृती करीत पाथरी पोलिस स्टेशनच्या हद्दीत शांतता प्रस्थापित करून एक मोलाचे कार्य केले. covid-19 मध्ये पोलिस प्रशासनाचे कार्य उल्लेखनीय व फार मोलाचे योगदान असून त्यांच्या कार्याची दखल घेत सावली तालुका महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ सावली तर्फे कोरोना योद्धा म्हणून पोलीस स्टेशन पाथरीचे पोलीस निरीक्षक योगेश घारे यांच्यासह त्यांच्या चमूचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
या कोरोना युद्धाच्या संरक्षणार्थ सैनीटायझर ऑटोमॅटिक मशीन चे वितरण महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ सावली तर्फे करण्यात आले व त्याचे उद्घाटन सोहळा पोलीस निरीक्षक योगेश घारे यांच्या हस्ते करून कोरोना योद्धा व लोकांपर्यंत लोकार्पण करण्यात आले.
या प्रसंगी पत्रकार संघाचे अध्यक्ष उपाध्यक्ष शरद सोनवणे सचिव बाबा मेश्राम प्रसिद्धीप्रमुख मोरेश्वर उद्योजवार लोकमत दुधे, प्रफुल तुम्मे, धनंजय मुद्दांमवार, प्रमोद गेडाम,यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.