जनता विद्यालयाचे मुख्यध्यापक मोहन गंधारे यांचा सेवापुर्ती सोहळा संपन्न

249

प्रशांत चरडे,
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,

साखरवाही येथील जनता विद्यालयाचे मुख्याध्यापक मोहन गंधारे सर यांचा सेवापुर्ती सोहळा संपन्न झाला.द्विप प्रज्वलीत करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष वामन खांगार सर, प्रमुख पाहुणे साखरवाहीचे सरपंच निरज बोंडे, जिप सदस्य रंजित सोयाम, सिद्धार्थ कवाडे सरपंच कोची महेंद्र भोयर पाटील सर वाघूजी आईलवार प्रवीण भुसारी मंचावर उपस्थित होते.
साखरवाहीचे सरपंच नीरज बोंडे यांनी शाल व श्रीफळ देऊन जनता विद्यालयाचे सेवा निवृत्त मुख्यध्यापक मोहन गंधारे सर यांचा सत्कार केला.
मोहन गंधारे सर यांनी ३२ वर्षे शिक्षक म्हणुन कार्य केले तर मागील २ वर्षा पासून ते साखरवाही येथील जनता विद्यालयात मुख्यध्यापक म्हणून कार्य केले.
यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक येडे सर यांनी केले तर संचालन बंडू बरडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी साखरवाही जनता विद्यालयाचे शिक्षक विवेक बोढे सर, ओमप्रकाश पिपरे सर, अजय आगलावे सर, गणेश काकडे यांनी परिश्रम घेतले. तसेच विश्रांती गंधारे सर्व शिक्षक कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.