अखेर आशा घटे आत्महत्या प्रकरणी क्षेत्रीय नियोजन अधिकारी जी.पूल्लया यांच्यावर गुन्हा दाखल. भादवी कलम ३०६ अंतर्गत आत्महत्येस प्रव्रूत करणे गुन्हा दाखल.

75

 

राजुरा (ता.प्र) :– ४ एप्रिल

वेकोलीच्या बल्लारपूर क्षेत्रातील महाप्रबंधक कार्यालयातील क्षेत्रीय नियोजन अधिकाऱ्याच्या दप्तर दिरंगाई आणि अपमानास्पद वागणुकीने त्रस्त होऊन सास्ती येथील आशा तुळशीराम घटे या १९ वर्षीय युवतीने आत्महत्या करून आपली जीवन यात्रा संपवली होती. तीन दिवसांच्या विलंबाने काल सायंकाळी वेकोली बल्लारपूर क्षेत्रातील नियोजन अधिकारी जी. पुल्लय्यावर भादवी कलम ३०६ अंतर्गत आत्महत्येस प्रव्रूत करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार आशाचे वडील व तिच्या आजोबांच्या नावाने असलेली शेती वेकोलीमधे अधिग्रहीत करण्यात आली आहे. या प्रकरनी महाप्रबंधक कार्यालयातील क्षेत्रीय नियोजन अधिकारी याने दिनांक २२ मार्च २०२१ ला आपल्या कार्यालयात बोलावून आशा सह तिच्या परिवारातील आई, वडील, मोठे वडील, काका यांना पाचारण केले. यावेळी तिचे वडील व आजोबा यांनी संमतीपत्राद्वारे आपल्या मुलीला नौकरी देण्याचे करारनामा दिला होता. परंतु या नियोजन अधीकार्याने आशा ला तिच्या संपूर्ण परिवारा समोर अपमानित करत अपशब्द वापरले असे तिच्या वडिलांसह कुटुंबातील नातेवाहिकांचे म्हणणे आहे. त्यानंतर तिने घरी येऊन विष प्राशन केले. परंतु आशा ने वीष प्राशन केले याबाबत घरच्याना काहीही माहिती नव्हते. दुसऱ्या दिवशी अचाणकपणे आशा ची प्रकुती खराब झाल्याने त्यांनी सास्ती येथील खाजगी रूग्णालयात औषधोपचार केले. आणखी प्रक्रुती बिघडत गेल्याने दिनांक २७ मार्च ला चंद्रपुर येथील खाजगी रूग्णालयात दाखल केले. दरम्यान परिस्थिती हाताबाहेर जात असल्यामुळे ३१ मार्च ला चंद्रपुर जिल्हा सामान्य रूग्णालयात पुढील उपचारांसाठी आणले असता सकाळी दहा वाजता च्या दरम्यान आशा ची प्रानज्योत मालवली होती. चंद्रपुर येथून म्रूतदेह घेऊन ते राजुरा पोलीस स्टेशनला तक्रार देण्याकरता आले असता त्यांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याने शेवटी त्रासून परिवारातील नातेवाहीकानी आशा चा म्रूतदेह वेकोली महाप्रबंधक कार्यालया समोर आणल्याने काही काळ परिस्थिती चिघडली होती. तात्काळ राजुरा पोलीस वेकोली कार्यालयाच्या प्रवेश दारावर पोहचले व दंगा नियंत्रण पथकाला पाचारण करण्यात आले होते. मात्र वेकोलीच्या कोणत्याही बड्या अधिकाऱ्यांनी या पिडीत कुटुंबियांची साधी विचारपूस सुध्दा यावेळी केली नाही. शेवटी पत्रकारांना आपली आपबिती सांगून मृतकाच्या नातेवाइकांनी आपले मुळगाव साखरी येथे आशावर अंत्यसंस्कार केले. दुसऱ्या दिवशी राजुरा तेली समाजाने स्वर्गीय आशा घटे ला न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेऊन अनेकांना निवेदन देऊन त्या अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी केली. जवळपास दोन तीन दिवस तिचे कुटुंबिय त्या अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी यासाठी प्रयत्न करीत होते. शेवटी काल सायंकाळी राजुरा पोलीस ठाण्यात क्षेत्रीय नियोजन अधिकार्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून लवकरच त्याला अटक होण्याची शक्यता आहे. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक बहादुरे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.पी.दरेकर करीत आहे.
वेकोलीच्या या अधिकाऱ्यामुळे स्थानिक प्रकल्पग्रस्त चांगलेच त्रस्त दिसत असून. त्यांना अनावश्यक कागदपत्र मागणे, त्याची पूर्तता न केल्यास पैशाची मागणी करणे, अरेरावी ने बोलणे, दलालांना जवळ करून प्रकल्पात जमिनी गेलेल्यांना ऑफिसातून अपमानित करीत बाहेर काढणे, असे प्रकार राजरोसपणे सुरु असल्याने या नियोजन अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अनेकांनी केली आहे.
वेकोलीच्या असंख्य कोळसा खाणीत शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत. नवनवीन खाणीत जमिनी जात असल्यामुळे शेतकरी आपल्या कागदपत्रांची जुळवाजुळव करून येथे नोकरीसाठी येतात, गोरगरीब ,अशिक्षित प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या अद्याणाचा फायदा घेऊन अशी ही त्याची वागणूक बरी नसून या नियोजन अधिकाऱ्याच्या विरोधात परिसरातील शेतकरी अधिकच संतप्त दिसू लागले आहे. अश्या या अधिकाऱ्याची तात्काळ उचलबांगडी करावी तसेच योग्य चौकशी करून त्याला निलंबित करावे, कायदेशीर कार्यवाही करावी अन्यथा आदोलन करू असा इशारा म्रूतक आशा च्या वडिलांसह तिच्या परीवारीतील नातेवाहीक, तेली समाज राजुरा तसेच अनेक प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी दिला होता हे विशेष.
जवळपास तीन दिवसापासून तगादा लावूनही त्या अधिकाऱ्यावर तक्रार दाखल होत नसल्याने कुटुंबियांना घोर निराशा झाली होती मात्र उशीरा का होईना पण काल त्या वेकोली च्या अधिकाऱ्यावर भादवी कलम ३०६ अंतर्गत आत्महत्येस प्रव्रूत करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आल्याबद्दल सर्व पत्रकार बांधव, तेली समाजबांधव ,राजकीय पुढारी ज्यांनी ज्यांनी आशा ला न्याय मिळविन्याकरीता सहकार्य केले त्या सर्वांचे बद्दल तिच्या कुटुंबियांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.