अखेर अचलपुर कृृृृ.उ.बा.स. संचालकांचा अंतरीम जामीन मंजूर

162

 

अमरावती(जिल्हा प्रतिनिधी, युवराज डोंगरे)
अचलपुर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विविध पद नोकरभरती घोट्याळ्याप्रकरणी अचलपूर पोलिसांनी सहआरोपी म्हणून कुठल्याच संचालकावर गुन्हा दाखल केला नसता नुसत्या अफवामुळे बाजार समितीच्या संचालकांनी तात्पुरता व अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून वकिलांच्या माध्यमातून न्यायालयीन प्रक्रिया करण्याकरीता आज अर्ज दाखल केले होते. दाखल केलेल्या अर्जावर अचलपूर जिल्हा सत्र न्यायाधीश एम.एच.पठान यांनी निर्णय देत 8 संचालकांचा अंतरीम जामीन मंजुर केला आहे.
अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नोकरी भरती प्रकरणी पोलिसांत संचालक मंडळ वगळता पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर काही संचालकांचे बयान नोंदविले होते. गुन्हा दाखल असलेल्या पाचही जणांना न्यायालयाने जामीन मंजूर केला. याप्रकरणी अचानक 1 एप्रिलला बाजार समितीच्या 17 संचालकांवर गुन्हे दाखल होणार अशी अफवा उडाली. घाबरलेल्या संचालकांनी अटकपूर्व जामीनासाठी प्रयत्नरत होते. अखेर न्यायालयात वकिलांच्या माध्यमातून सोमवारी न्यायालयात धाव घेत अर्ज दाखल केले. जिल्हा व सत्र न्यायाधिश एम.एच.पठान यांनी याप्रकरणी निर्णय देत आठ संचालकांना अंतरीम जामीन मंजुर केला. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गंगाधर चौधरी, राजेंद्र गोरले, राजा टवलारकर, गंगाराम काळे यांच्यावतीने ॲड. नितीन चौधरी यांनी, गजानन भोरे, बाबुराव गावंडे, शिवबा काळे यांच्यावतीने ॲड.महेश देशमुख, सतीशकुमार व्यास यांच्यावतीने ॲड.वकार यांनी अर्ज दाखल केला. वरील आठ संचालकांना अंतरीम जामीन प्राप्त झाला असून इतर संचालकांचे जामीन अर्ज दाखल झाल्यास त्यांनाही जामीन मिळण्याची शक्यता आहे.