अखेर घेरावाच्या धसक्याने शेतकऱ्यांना मिळणार कृषी पंपासाठी सुरळीत विज उपविभागीय अभियंता बोबडे याचे आश्र्वासन

204

 

गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम याच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी दिलेल्या धसक्याने प्रशासनात खळबळ माजुन विज पुरवठा सुरळीत करुण प्रयत्नाला यश आले आहे.
देवानंद जांभूळकर जिल्हा प्रतिनिधी
जोगीसाखरा- परीसरातील शेतक-यांच्या कृषी पंपाचा विज पुरवठा गेल्या सात दिवसांपासून विस्कळीत झाल्याने शेतकरी वर्ग हवालदिल होऊन धान पिक पाण्या अभावी सुकले असल्यामुळे आरमोरी तालुक्यासह परीसरातील शेतकऱ्यांच्या कृषी पपाची विज विस्कळीत झालेली विज सुरळीत करा अन्यथा विज महावितरण च्या अधिकाऱ्यांना दि ५एफ्रिलला घेराव घालु अशा इशाराच गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम याच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी प्रशासनाला यावरुन आज दिनांक ५ एफ्रिल ला आरमोरी येथील महावितरण ला धडक देऊन उपविभागीय अभियंता बोबडे यांना घेराव घालून निवेदन देण्यात आले असल्याने प्रशासनात खळबळ माजुन अखेर शेतकऱ्यांच्या कृषी पंपासाठी सुरळीत विज देण्याचे आश्वासन उपविभागीय अभियंता बोबडे यांनी गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम याच्या नेतृत्वात शेतकऱ्यांना दिला आहे.

कोरोना विषाणुमुळे देशासह राज्यभरात लाॅकडाउन करण्यात आले होते. या कालावधीत अर्थव्यवस्था ठप्प झालेली होती. छोटया मोठया व्यावसायिकांसह शेतक-यांनाही मोठया प्रमाणात आर्थीक फटका बसला. लाॅकडाउन, अतिवृष्टी या समस्यांनी जर्जर झालेल्या बळीराजाची उन्हाळी धान मका पिकांमुळे आर्थीक विवंचना कमी होईल असे वाटत असतांनाच महावितरणने गेल्या चार दिवसांपासून कृषी पंपाचा वीज पुरवठा वारंवार विस्कळीत झाल्याने पिकेही हातची जाउन मोठा आर्थीक भुर्दंड सोसावा लागणार आहे.
कोरोना, लाॅकडाउन, नैसर्गिक आपत्ती अशा विविध बाजुने घेरल्या गेलेल्या शेतक-यांची पदरी गेल्या वर्षीही निराशा आली. खरीपाचे पिके वाया गेल्याने ते उभे करण्यासाठी घेतलेले कर्जही फिटले नाही. त्यामुळे यावर्षी जोगी साखरा शंकरनगर रामपुर कासवी सालमारा आष्टा अंतरजी पळसगाव येथील शेतकऱ्यांनी नदि नाले.जमिनीवर बोरवेल विहीर यामध्ये पाणी साठा निर्माण करुण उत्पन्नात वाढ व्हावी या उद्देशाने महागडी धान मका ईतर बिजाई खत औषधी घेऊन मोठ्या प्रमाणात धान मका पिक घेतले परंतु गेल्या चार दिवसांपासून कृषी पंपाची विज पुणता विस्कळीत होऊन शेतीतील धान पाण्या अभावी सुकले पहीलेच धान पिक रोवनीला शेतकऱ्यांनी उसनवार व्याजाने कर्ज कडुन पिके लावली असताना पाण्या अभावी जमीनीला भेगा पडल्या तसेच शेतकऱ्यांचे वारंवार विजेच्या कमी-जास्त दाबामुळे कृषी पंप जळुन अधिकच शेतकऱ्यांच्या नुकसानीत भर पडली आहे. उन्हाळी धान पिक हे जातीत जास्त खालच्या पाण्यावर अवलंबून असुन सेवटच्या एफ्रिल मे महिन्यात जास्त पाण्याची गरज असते परंतु याच महिन्यात विज विस्कळीत झाल्यामुळे शेतक-यांपुढे आणखी मोठे संकट उभे राहिले आहे. या समधी वारंवार विजेची समस्या विज वितरणाचा अधिकाऱ्यांच्या लक्षात आणुन दिली असतांनाही दखल न घेता उलट शेतकऱ्यांच्या कर्जात बुडविण्याचे काम सुरू असल्याने तात्काळ जोगी साखरा परीसरासह आरमोरी तालुक्यातील विस्कळीत झालेली कृषी पंपाची विज सुरळीत करा तसेच ज्या शेतकऱ्यांनी २०१८ नंतर विज कनेक्शन चे डिमांड भरले परंतु मिटर देण्यात आले नाही असे असताना त्या शेतकऱ्यांनी गैरकानुनी स्वता ईतराच्या कृषी पंपाच्या खांबावरील तारांवर आकोरेतार ताकृण कनेक्शन जोडुन पिके घेत आहेत त्याच्या कनेक्शनच्या बिल भरपाई अवाच्या सव्वा कायद्याने कृषी पंपासाठी विज मिटर घेतलेल्या शेतकऱ्यांवर बिलाचा भुदडाची भरपाई कनेक्शन धारक शेतकऱ्यांवर बसत असल्यामुळे विज वितरण कंपनीने डिमांड भरलेल्या शेत पिकाची चौकशी करुण कारवाई करण्यात यावी अन्यथा दि ५ एफ्रिलला आरमोरी येथील विज महावितरण च्या अधिकाऱ्यांना घेराव घालु अशा इशाराच गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम याच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिला होता यावरुन आज गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम याच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी विज वितरण कंपनीच्या कार्यालयात धडक देऊन उपविभागीय अभियंता बोबडे यांना घेराव घालुन निवेदन देण्यात आले यात जो पर्यंत शेतकऱ्यांच्या कृषी पंपाच्या समस्या सोडविनार नाही तो पर्यंत आम्ही हटनार नाही असे सांगितल्याने एकच खळबळ माजुन अखेर उपविभागीय अभियंता बोबडे यांनी शेतकऱ्यांच्या कृषी पंपासाठी विज सुरळीत आजपासुन देणार व कृषी पपाची विज गैरकानुनी चोरी करणाऱ्या वर कारवाई करु असे आश्वासन दिले
यावेळी गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम सामाजिक कार्यकर्ते भिमराव ढवळे माजी उपसरपंच देवनाथ झलके कासवीचे उपसरपंच प्रविन ठेगरी शंकरनगर मा.उपसरपच नारायण सरकार.ग्रा.प.सदस्य रुमदेव सहारे ग्रा.प.मा.सदस्य आसाराम प्रधान राजकुमार नदरधने राजु घोडाम. विलास नैताम ‌आण्याभाई राऊत किशोर भोयर कुश वाटगुरे विजय धारणे मोहीत ठाकरे एन एस बुरांडे यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.