अंगणातील ४ दुचाकी टाकल्या नाल्यात कापुसतळणी ची घटना

226

अमरावती(जिल्हा प्रतिनिधी, युवराज डोंगरे)
कापुसतळणी येथील मिट्टु नाल्याकाठी श्रीराम मंदीर नजीक असलेल्या परिसरातील नागरीकांच्या घरासमोरील अंगणात उभ्या असलेल्या ४ दुचाकी रात्रीच्या सुमारास नाल्यात सापडल्याने खळबळ माजली. प्राप्त माहीतीनुसार भैय्या ज्ञानेश्वर शेंडे, गोपाल कोरडे, मयुर इंगळे, सोपान रोडे यांच्या मालकीच्या दुचाकी आपआपल्या अंगणात रात्री ठेवल्या असता मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात समाजकंटकाने घराना लागुनच असलेल्या नाल्यात फेकुन दिल्या असता दुचाकींचे नुकसान झाले आहे. सदर्हु घटना सकाळी गावकर्‍यांना समजताच बघ्यांची गर्दी जमली. दुचाकी मालकानी सकाळी रहीमापुर पोलीस स्टेशनला सुचना केली असता दुपारी हे. पो. काॅ.संजय मार्कंड गजानन शेरे यानी पंचनामा केला. दुचाकी चोरट्याने लांबवण्याचा प्रयत्न केला की समाजकंटकाचा विक्षीप्तपणा ही चर्चा तालुक्याभरात रंगली असता चोरट्यानी सर्व दुचाक्या चोरुन नेण्याऐवजी नाल्यात का टाकल्या हा ही प्रश्न निर्माण झाला आहे. शक्यतोवर हा खोडसाळपणाच असावा असा निष्कर्षाचा सुर गावकरी काढत आहे. अंजनगाव तालुका परिसरात चोर्‍यांचे प्रमाण वाढत असल्याने गावकर्‍यानी पोलीसानी श्वान पथकाकडुन तपास करुन घटनेचा माग घेण्याची मागणी केली आहे.
गावाची सुरक्षा वार्‍यावर
कापुसतळणी गाव जवळपास २० हजार लोकवस्ती असुन अतीसंवेदनशिल आहे. गाव रहीमापुर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असुन गावात पोलीस चौकी तैनात आहे ती मात्र नावालाच काही अनुचित प्रकार घडला व माहीती मिळाली तरच पोलीस नजरेस पडतात ही वास्तव परिस्थीती समजली. चौकशी केली असता पोलीस स्टेशनला अपुरा कर्मचारी वर्ग असल्याचे कारण पुढे आले. लखाड येथील ग्रामस्थानी मीच माझ्या गावाचा रक्षक ही संकल्पना राबवली असता ह्याच संकल्पनेचा वापर कापुसतळणीकर करतील अशी माहीती मिळाली.
नाल्यात टाकलेल्या दुचाकी