घुग्गुस येथील वेकोलीच्या सर्व जीर्ण क्वार्टची तात्काळ दुरुस्ती करा घुग्गुस भाजपा शहराध्यक्ष विवेक बोढे यांची मागणी

142

 

प्रशांत चरडे,
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,

गुरुवार 1 एप्रिल ला रात्री दरम्यान घुग्गुस येथील वेकोली वसाहतीच्या सुभाषनगरच्या क्वार्टर क्र. एमक्यू 35,36,39,40 मध्ये राहणाऱ्या प्रज्ञा साव, संतोष कुमार, सुधाकर भोंगळे व संतोष धुर्वे यांचे कुटुंब राहते. परंतु गुरुवार 1 एप्रिल रोजी रात्री दरम्यान सुभाषनगरच्या दुमजली क्वार्टरचे जिनाचे स्लॅब कोसळले. रात्रीची वेळ असल्याने क्वार्टरच्या बाहेर खालच्या क्वार्टर मधील राहणारे कोणीच नसल्याने सुदैवाने बचावले .1990 च्या दरम्यान वेकोलीच्या जागेवर कामगारांना राहण्यासाठी वेकोलीने येथे क्वार्टर बांधले होते. परंतु आता हे क्वार्टर जीर्ण अवस्थेत आहे. अधून मधून थातूरमातुर या क्वार्टर ची डागडुज्जी केली जाते.
वेकोलीच्या कामगारांना जिवमुठीत घेऊन आपल्या कुटुंबियांसह या जीर्ण क्वार्टर मध्ये राहावे लागते. तसेच नालीची सफाई करणे, रस्त्यावर पथ दिवे लावणे, रस्त्यावरील जागोजागचे खड्डे बुझविणे अश्या समस्यांकडे वेकोली व्यवस्थापनाचे मोठे दुर्लक्ष होत असल्याने वेकोली व्यवस्थापनाचे याकळे लक्ष वेधण्यासाठी घुग्गुस भाजपा शहराध्यक्ष विवेक बोढे यांनी शिष्टमंडळासह घुग्गुस वेकोलीचे उपक्षेत्रीय प्रबंधक सुजितकुमार पिसारोडी यांची भेट घेऊन तब्बल एक तास चर्चा केली आणि वेकोली कामगारांची समस्या लक्षात घेत निवेदन दिले.
यावेळी घुग्गुस वेकोलीचे उप क्षेत्रीय प्रबंधक सुजितकुमार पिसारोडी यांनी सकारात्मक चर्चा करीत तात्काळ मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. निवेदन देतांना घुग्गुस भाजपा शहराध्यक्ष विवेक बोढे माजी पंस उपसभापती निरीक्षण तांड्रा माजी उपसरपंच संजय तिवारी,माजी ग्रामपंचायत सदस्य सिनू इसारप भाजपा नेते श्रीकांत सावे, इम्तियाज रज्जाक, बबलू सातपुते, विनोद जंजर्ला उपस्थित होते.