साखरपुडा खरेदीसाठी लांज्यात आलेल्या तरुणांचा अपघाती मृत्य. लग्न मंडपात मृतदेह पाहून सारे हळहळले.

253

 

प्रतिनिधी : निलेश आखाडे.

लांजा : स्वत:च्या साखरपुड्यासाठी व लग्नाच्या खरेदीसाठी लांजा बाजारपेठेत आलेल्या तरुणाचा मोटारसायकल अपघातात जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल दुपारी घडली. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव अक्षय केशव सोलीम (वय २२) असे आहे.
अक्षयचे ७ एप्रिलला लग्न होते. रविवारीच साखरपुडा होता त्याच्या खरेदीसाठी अक्षय हा लांजा बाजारात आला होता खरेदी करून परत जात असताना तो चालवत असलेल्या भरधाव वेगातील दुचाकीने प्रथम मागून इर्टिकाला मागून धडक देऊन समोरून गोवा दिशेने जाणाऱ्या ट्रकला धडक दिली. यात दुचाकी चालवणारा अक्षय केशव सोलीम (वय २२,राहणार ओशी) हा जागीच ठार झाला तर मागे बसलेला निलेश वासुदेव भालेकर हा किरकोळ जखमी झाला आहे अक्षय सोलीम याचा आज साखरपुडा होता व ७ एप्रिल ला लग्न होते. साखरपुड्यासाठी मिठाई व इतर सामान खरेदीसाठी लांजात आला होता. तो घरी परतत असतानाच हा दुर्दैवी अपघात झाला. विवाहबंधनात अडकण्याचे स्वप्न अधुरे राहिले दुपारी 12: 15 च्या सुमारास मुंबई गोवा महामार्गावर शहरानजीक उपशेट्येवाडी फाट्यानाजीक हा अपघात घडला. ज्या मंडपात अक्षयचा साखरपुडा होणार होता त्याच मंडपात मृतदेह आल्याने सार्यांचे मन हेलावून गेले. पंचक्रोशीत दुःखाचे डोंगर दाटले होते.

*दखल न्यूज भारत.*