तालूक्यातील कोरोना योद्धांचा सत्कार (जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेचा पूढाकार)

337

कूरखेडा/राकेश चव्हान प्र
वैश्विक महामारी कोवीड १९ मूळे देशात निर्माण झालेल्या अभूतपूर्व परीस्थीत तालूक्यात आपल्या जिवाची तमा न
बाळगता आपले कर्तव्य चोखपणे बजावणार्या येथील प्रशाशकीय सेवेतील अधिकारी, कर्मचारी ,सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार यांचा कार्याची दखल घेत जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्था विदर्भ प्रदेश यांचा वतीने कोरोना योध्दा म्हणून स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र देत गौरव करण्यात आला
कार्य तत्पर कोरोना योध्दा येथिल तहसीलदार सोमनाथ माळी, ठाणेदार सूधाकर देडे ,नगर पंचायतचा मुख्याधिकारी नमीता बांगर, उपजिल्हा रूग्नालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ संभाजी ठाकर ,बालविकास प्रकल्प अधिकारी गणेश कूकडे ,पत्रकार सिराज पठान, गृहपाल सदाशिव नरताम, डॉ जगदीश बोरकर ,डॉ योगेश मानकर, रूग्नवाहीका चालक जावेद शेख,हूसेन मेश्राम,कासम अली सय्यद यांचा सत्कार करण्यात आला यावेळी संस्थेचे कूरखेडा तालुका अध्यक्ष भारत गावळ सचिव जावेद शेख उपाध्यक्ष श्याम थोटे नरहरी टेकाम कैलाश उईके अनिल ठाकरे जयचंद सहारे हेमंत घोघरे जयदेव नाकाडे निलकंठ मडावी आदि उपस्थित होते