काल होता, आज सकाळीच मोहफुले वेचायला गेला, आणी वाघाचा बळी ठरला. कोरोणाचे महामारीत गांवखेड्यात रोजगार निर्मिती ची खरी गरज

222

(चंद्रपूर जिल्हा)
भगवंत टि. पोपटे,
उपसंपादक-९२८४५८३८१३
दखल न्युज व दखल न्युज भारत

मार्च २०२० पासून कोरोणाची महामारी, हतावर आणून पानावर खानाऱ्या कुटूंबाची वाताहत झाली आहे. नियमीत हाताला काम नसल्याने कामाचे दाम नाही. दाम नाही तर कुटूंबाचा खर्च कसा भागवायचा या विवंचनेत आणी दूहेरी कात्रीत जिल्ह्यातील काबाडकष्ट करून, पोटाची खडगी भरण्याचे प्रयत्नात असतांना वन्यप्रान्यांचे हमल्यात निष्पाप मानसाचा बळी जातो. कुटूंबातील कर्ता पुरूष सोडून गेल्याने कर्त्यावर अवलंबून असलेल्या सदस्यांवर उपासमारीची पाळी यावी, यापेक्षा दुर्दैव ते कोणते.*
हिंस्त्र प्राणी वाघ याचे हमल्यात जिव गमवावा लागला तो श्रीधर राघो आत्राम वय ५५ वर्षे, रा. शिरकाडा ता. सिंदेवाही जिल्हा चंद्रपूर येथील वनमजूर मानसाला. परिसरात कोणताही रोजगार उपलब्ध नसल्याने वनव्याप्त गावातील सामान्य मजूर मानसाला वनावरती अवलंबून राहावे लागते. वनातून डिंक, मोहफूले, तेंदूपाने उपलब्ध होत असून त्यापासून सिजनेबल रोजगार उपलब्ध होतो. सध्या जंगलात मोहाच्या झाडापासून मोहफूले झाडाखाली पडत असून, त्याचेपासून रोजीरोटीचा प्रश्ण सुटावा व दोन पैसे घरात यावे म्हणून, जंगलाशेजारी असलेल्या गावातील लोक मोहफुले गोळा करण्यासाठी जंगलात जातात. त्या मोहफुलांचा उपयोग गुरांना चारण्यासाठी व गरीब माणूस मोहफुलाच्या भाकरी बनवून खाण्यासाठी करतो.
त्यासाठीच श्रीधर आत्राम हा शिवणी वनपरिक्षेत्रातील बफरझोन असलेल्या कंपार्टमेंट नं. २३५ मध्ये सकाळीच मोहफुले गोळा करण्यासाठी गेला होता. तो मोहफुले गोळा करण्यात गर्क असता, बाजूलाच दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने नकळत सकाळी ८-००वाजता दरम्यान श्रीधरवर जबरदस्त हमला केल्याने व त्याला ओरडण्याचीही उसंत न मिळाल्याने जागेलरच ठार मारल्या गेला.*
*वाघाचे हमल्यात म्रुत पावन्याच्या परिसरात अनेक घटना घडल्या असून, वनविभाग म्रुताचे कुटूंबियांना तोकडी आर्थीक मदत देऊन सांत्वना करण्याचे काम केले जाते, हा पर्याय नसावा. शासनाने व वनविभागाने जंगलव्याप्त गावांसाठी कायमस्वरूपी रोजगार निर्मिती करूण, सामान्य मजूर, वनमजूर यांच्या आशा पल्लवीत होतील यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
जन्म म्रुत्यूचे चक्र हे अविरत सुरूच राहणार आहे, हे निर्विवाद सत्य असले तरीही कर्त्या व कुटूंबप्रमुखाचे अकाली जाण्याने त्याचे अख्खे कुटूंबच हतबल होऊन, त्याचे कुटूंब सावरायला अनेक वर्षे लागतात. ती वेळ सामान्य मजूर मानसावर येऊच नये यासाठी जंगलव्याप्त गावांचे विकासासाठी व त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्ण सोडविण्याची खरी आवश्यकता आहे.
वाघाचे हमल्यात मरण पावलेल्या व्यक्तीचे समर्थनार्थ गावातील नागरिकांनी ठाम भूमिका घेतली होती की, घटणास्थळी वनविभागाचा जबाबदार अधिकारी हजर होऊन, ग्रामस्थांचे म्हणने ऐकून घेत नाही तोपर्यंत घटणास्थळावरून म्रुताचा म्रुतदेहच हलवू द्यायचा नाही. यामुळे घटणास्थळावर कांहीसा तणाव निर्माण झाल्याने शांतता भंग होऊ नये म्हणून, सिंदेवाही पोलीस स्टेशणचे ठाणेदार ए. पी. आय. योगेश घारे हे आपल्या ताफ्यासह पोचल्याने शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यास सहकार्य लाभले. तद्वतच वनाधिकारी व क्षेत्राचे जि. प. सदस्य रमाकांत लोधे हे सुद्धा पोचून, सामान्य मजूर मानसांना भेडसावणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी अभिवचन देऊन व पक्षाचे वतीने म्रुताचे कुटूंबियास आर्थिक मदत देऊन त्यांचे सांत्वन केले. आजूबाजूचे गावातील नागरिकांनी कायम रोजगार उपलब्ध
व्हावा अशी मागणी रेटून धरली आहे. त्यामुळे राज्य शासनाने व वनविभागाने याची त्वरीत दखल घेऊन, रोजगार निर्मितीसाठी धडक योजना राबवीली जावी, अशी रास्त मागणी परिसरातील जनतेमध्ये जोर धरत असल्याचे खात्रीलायक व्रुत्त आहे.