मिशन दारू बंदीला प्रथम प्राधान्य – डॉ जयस्वाल

186

 

पंकज चहांदे
दखल न्यूज भारत

नुकतेच देसाईगंज पोलिस स्टेशन येथे पोलिस निरीक्षक म्हणून डॉ. विशाल जयस्वाल यांनी पदभावर स्विकारला .त्यांनी पदभार स्वीकारताच अवैध दारू विक्रत्यांवर कारवाईचा धडाका सुरु करीत तब्बल १ लाख रुपयाची दारू जप्त केली.तर शहरात होत असलेली अवैध दारू विक्री मिशन दारू बंदीला प्रथम प्राधान्य देत कठोर कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही पत्रकारांना पोलिस निरीक्षक डॉ.जयस्वाल यांनी दिली .
दि.३ मार्चला पो.स्टे.देसाईगंज येथे नवनियुक्त ठाणेदार व पत्रकारांची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी ते बोलत होते. यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश खांडवे व बहुसंख्य पत्रकार उपस्थित होते .
पुढे बोलतांना पो.नि.डॉ.जयस्वाल म्हणाले कि, शहरात होत असलेल्या अवैध दारू विक्रीला प्रथम प्राधान्य देण्यात येत असून शहरातील व तालुक्यातील अवैध दारू विक्रेत्यावर कठोर पाउले उचलण्याची त्यांनी तय्यारी दर्शविली.शहरासह व तालुक्यात होत असलेली अवैध दारू विक्रीमुळे अनेकांचे संसार उध्वस्त होत असून यामुळे दारू विक्रेते मालामल होवून गोर – गरीब जनता कंगाल होत आहे .संपूर्ण दारूबंदी करणे शक्य नसले तरी अवैध दारू विक्रेते लहानापासून ते मोठ्या पर्यत सर्वावर समान कारवाई करण्यात येईल असेही ते म्हणाले,तर अनेक विक्रेत्याना आल्या-आल्या दारू विक्री बंद करण्यात सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले .