बिग ब्रेकिंग पोलीस-नक्षली चकमकीत ५पोलीस जवान तर ९ नक्षली ठार,३२जवान जखमी तर २१ जवान अद्यापही बेपत्ता 600 पोलीस शोध मोहीमसाठी रवाना

736

 

हर्ष साखरे दखल न्युज भारत

रायपूर : छत्तीसगडमध्ये नक्षल्यांविरोधात झालेल्या चकमकीत 5 जवान शहीद झाल्याचे वृत्त समोर आले आहे. या चकमकीत ३२ जवान जखमी झाले असून २१ जवान अद्याप बेपत्ता आहेत.तसेच ९ नक्षली ठार झाले अशी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी बोलताना याबाबत माहिती दिली. या चकमकीत 5 जवान शहीद झाले असून यापैकी केवळ दोन शहिदांचा मृतदेह सापडला आहे.
अद्यापही 3 शहीद जवानांचे मृतदेह बिजापूर जंगलात असल्याची शक्यता आहे. सध्या 3 शहीद जवान मिळून 18 जवान बेपत्ता आहेत. बेपत्ता जवानांबाबत अद्याप कोणतीही माहिती मुख्यालयापर्यंत पोहोचली नसल्याचे सांगितले जात आहे. सकाळी पुन्हा पोलिसांचं सर्च ऑपरेशन सुरू होईल. ही चकमक कुख्यात कमांडर हिडमा याच्या टोळीसोबत झाला आहे.
एकीकडे देशभरात कोरोनाने धुमाकूळ घातला असता दुसरीकडे नक्षल्यांकडून हल्ले सुरूच आहे. मिळालेल्या माहितीनुसार छत्तीसगडमधील बिजापुर येथे पोलीस आणि नक्षल्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत 5 जवान शहीद झाले असून यामध्ये 2 छत्तीसगड पोलीस, 2 कोब्राचे जवान (CRPF) आणि 1 सीआरपीएफच्या बस्तरिया बटालियनचा जवान आहे.सर्व जखमी जवानांना हेलिकॉप्टरने दवाखान्यात पाठवले आहे.