श्री साईनाथ विद्यालय मालेवाडाचा S.S.C. चा निकाल ८९ टक्के

छन्ना खोब्रागडे प्रतिनिधी
नेहमी प्रमाणे यशाची परंपरा कायम ठेवत श्री. साईनाथ विद्यालयने दहावीचा निकाल ८९.००% देत नेत्रदीपक भरारी मारली आहे. २०१९-२०२० या सत्रात एकूण ९६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यापैकी ८४ विद्यार्थी पास झालेले आहेत. कु. रामेश्वरी राकेश नागोसे ह्या विद्यार्थीनीने ८३.६०% घेत प्रथम क्रमांक पटकावला, द्वितीय क्रमांक स्नेहा होमराज दखणे (८१.००%) तर तृतीय क्रमांक सुशील हिरामण चांग (८०.२० ) कु.खुशबू गुरुदेव उईके चवथा (७७.४०), वसुंधरा मनोज जेंगठे (७७.२०) हिने पाचवा क्रमांक पटकावला. दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा मुली अग्रेसर आहेत हे स्पष्ट झाले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आपले पालक व शिक्षक वृंदांना दिले आहे. मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सर्व गुणवंतांना पुढील वाटचालीसाठी मनःपुर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.