अबब…. वणीतील खाजगी कोविड केंद्राची आरोग्य विभागालाच माहिती नाय… मानवाधिकार समितीने जिल्हाधिकारी यांच्याकडे मागीतली माहिती

61

 

वणी : परशुराम पोटे

वणी शहरानजीक असलेल्या चिखलगांव ग्रामपंचायत हद्दीमध्ये येणाऱ्या खाजगी कोविड केंद्रामध्ये रुग्णांसंबंधीची माहिती घेतली असता माहिती देण्यास संबंधित विभागासह कोणीही कोणीही माहिती देण्यास तयार नाही. याबाबत तालुका वैद्यकीय अधिकारी, तहसिलदार, उपविभागीय अधिकारी वणी तसेच जिल्हा शल्य चिकित्सक यवतमाळ यांच्याकडुन माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडुन सुद्धा माहिती मिळाली नसुन उलट सदर खासगी कोविड केंद्राबाबत माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले, त्यामुळे सदर खासगी कोविड केंद्राबाबतची माहिती मिळविण्याकरिता जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्याकडे दि.२६ मार्च रोजी एका निवेदनाद्वारे मानवाधिकार समितीच्या जिल्हाध्यक्षा सौ राजेश्री पाझारे यांनी मागणी केली आहे.
सविस्तर असे की, चिखलगा(वणी) येथील सुगम मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल जवळ मागील दोन महिन्यांपासून एक खाजगी कोविड केंद्र सुरू आहे. त्या केंद्रामध्ये दिनांक 17 मार्च 2021 ला बाबापूर येथील एक इसम मरण पावला असता त्यासंदर्भात माहिती मागितली, मात्र तालुका वैद्यकीय अधिकारी, तहसीलदार, नगर परिषद मुख्यधिकारी, उपविभागीय अधिकारी वणी तसेच जिल्हा शल्य चिकित्सक अधिकारी यवतमाळ यांना माहिती विचारली, मात्र कोणत्याही संबंधित अधिकाऱ्याला या सुगम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथिल खाजगी कोविड केंद्रा बाबत माहीती नाही असे त्यांनी सांगितले.तसेच जिल्हा शल्य चिकित्सक यांना 18 मार्च ला वारंवार फोन केले त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली असून कोणीही माहिती देण्यास अथवा या खाजगी कोविड केंद्रा बद्दल माहिती देण्यास तयार नाही. मृत्यू झालेल्या व्यक्तीचा अंतिम संस्कार करण्यासाठी रुग्णवाहिकेचा चालक नगर परिषद च्या कर्मचाऱ्यांना फोन करतो व ते कर्मचारी कोणत्याही अधिकृत डॉक्टर चे प्रमाणपत्र न घेता अंतिम संस्कार करतात व
मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या परिवारां कडून लाखो रुपये खर्च वसूल करण्यात येतो या संदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता कोणीही माहिती देण्यास समोर आले नाही, या खाजगी कोविड केंद्रात असे कोणते उपचार करतात की लाखो रुपये लागतात? याठिकाणी उपचारासाठी लागणारे खर्च दर पत्रक सार्वजनिक करावे, विशेष म्हणजे सुगम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल याच आवारात असुन तेथील डॉक्टर कोविड केंद्रात तपासणी करतात आणि तेच डॉ. सुगम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये इतर रुग्णांची तपासणी करतात काय ? की दुसरे डॉक्टर ची वेगळी चमू आहे? या कोविड केंद्रा संदर्भात काही शासकीय नियम लागू नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यामुळे कोरोना चा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाही का? हे खाजगी कोविड रुग्णालय आपल्या परवानगीने सुरू आहे का? वणी येथील सरकारी रुग्णालयातील आरोग्य विभागाच्या गलथान कारभारामुळे 71 वर्षाचे वृध्दाचा मृत्यू झाला, असा आरोप त्यांच्या मुलाने केला आहे. सर्वत्र कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असून वणी शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे, त्यामुळे या खाजगी कोविड केंद्राबाबत जनतेच्या मनातील शंका दूर कराव्या अशी मागणीही मानवाधिकार समितीच्या
जिल्हाध्यक्षा सौ राजेश्री पाझारे यांनी जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्याकडे या संदर्भात माहिती मागविली असून जिल्हाधिकारी काय माहिती देतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.