ब्रेकिंग न्युज आरमोरी तालुक्यातील पिसेवडधा येथे 43 हजाराचा सुगंधीत तंबाखू जप्त ; धानोरा पोलिसांची कार्यवाही

222

 

हर्ष साखरे ता प्रतिनिधी आरमोरी
प्राप्त माहितीनुसार

पिसेवडधा :-
आरमोरी तालुक्यातील पिसेवडधा गावांमध्ये धानोरा पोलिसाकडून धाड पाडून 43 हजाराचा सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आला आहे. तसेच एका आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. सदर कारवाई धानोरा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या आरमोरी तालुक्यातील पिसेवडधा या ठिकाणी धानोरा पोलिसांनी माहितीच्या आधारे छापा टाकण्यात आली .यावेळी सदर इसमाच्या घरी व दुकानात अधिक चौकशी केली असता 43 हजार रुपयाचा सुगंधी तंबाखू जप्त केला असून आरोपींला
पोलीसांनी न्यायालयात दाखल केले असता न्यायालयाने आरोपीची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.
पुढील कारवाई धानोरा पोलीस स्टेशन अंतर्गत सुरू असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.