ईसीजी टेक्निशियन व कोरोना लसीकरण पदभरती लवकर करा :- राजु झोडे कोरोना लसीकरणातील अनियमितता तसेच जिल्हा रुग्णालयात ईसीजी टेक्निशियनचे पदे भरण्यात यावी करिता राजू झोडे यांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन.

73

 

दख़ल न्यूज़ भारत : शंकर महाकाली

 

बल्लारपुर(चंद्रपूर) : सध्या महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण मोहीम सुरू आहे.परंतु लसीकरण मोहिमेत कोणत्याही प्रकारचे नियम पाळले जात नसल्यामुळे जनतेच्या जीवाशी खेळ सुरू आहे. कोरोना वरील लस देताना कोल्डचेन मेंटेन होणे अत्यंत गरजेचे आहे.लस परिणामकारक होण्यासाठी सदर व्यासी २ ते १० डिग्री तापमानामध्ये राहून लसीकरण मोहीम राबवणे आवश्यक आहे असे तज्ञांचे मत आहे.परंतु जिल्ह्यात कोरोनावर लसीकरण मोहीम राबवताना अशा कोणत्याही मानकांचा वापर होत नसून २० ते २५ डिग्री तापमानात सर्वत्र लसीकरण दिल्या जात आहे. त्यामुळे लसीकरणाचा परिणाम किती प्रमाणात होत आहे हे कित्येक उदाहरणावरून दिसून येत आहे. तसेच जिल्हा ग्रामीण रुग्णालयांमध्ये ईसीजी टेक्निशियन चे पद रिक्त असल्यामुळे गोविंद रुग्णावर व अन्य रुग्णावर उपचार करण्यास अडथळा होत असून सर्वसामान्य गरीब रुग्णांना मोठ्या प्रमाणात आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे उपलब्ध नसल्यामुळे सर्वसामान्य जनतेला ईसीजी करण्यास अडचण होत असून योग्य उपचाराअभावी रुग्णांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे ही बाब अतिशय गंभीर असून ईसीजी टेक्निशियन नसल्यामुळे रुग्णालयातील डॉक्टरांना उपचार करण्यासाठी त्रास होत आहे. याबाबत जिल्हा संदेश चिकित्सक यांनी तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. वरील दोन्ही मागण्यांना घेऊन गुलाम संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी माननीय जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून निवेदन दिले. कोरोना लसीकरणातील अनियमितता दूर करून लसीकरणात पारदर्शकता यावी तसेच ईसीजी टेक्निशियन ची पदे तात्काळ भरून रुग्णांना आर्थिक व मानसिक त्रासापासून वाचवावे या दोन्ही मागण्या महत्वपूर्ण असून याकडे आरोग्य विभागाने व प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.