श्री माऊली सेवाभावी सामाजिक संस्थेमार्फत माणिकगड संवर्धन आणि स्वच्छता मोहीम संपन्न

97

 

प्रतिनिधी : निलेश आखाडे.

ठाणे : श्री माऊली सेवाभावी सामाजिक संस्था विटावा,ठाणे ही संस्था अनेक वर्षे आदिवासी भागात अन्नधान्य वाटप ,कपडे वाटप तसेच शैक्षणिक साहित्य वाटप करत आहे.कोरोनाच्या काळात अनेक गरजू लोकांना अन्नधान्य वाटप केले होते.श्री माऊली सेवाभावी सामाजिक संस्थेमार्फत पणवेल पासुन रसायनी,वडगाव मधुन माणीकगडावर संवर्धन आणि स्वच्छता मोहीम होळी निमीत्त रविवार दिनांक 28-3-2021 रोजी आयोजित करण्यात आली होती. गडावर जाऊन गड स्वच्छ करण्यात आला.गडावरील ढासळलेले बुरूज , कोसळलेले दरड दगड आणि त्यावर जमा झालेले मातीचे ढीग आणि पाण्याची टाकी स्वच्छ करण्याचे काम करण्यात आले आहे. या मोहिमेत संस्थेचे अध्यक्ष श्री सतिश चव्हाण यांच्यासह संस्थेचे सभासद सहभागी झाले होते. श्री लक्ष्मण पाटील, श्री संदिप नाईक,श्री मोहन कचरे ,श्री मंगेश गावडे, श्री उमेश गावडे,श्री शशिकांत मत्रे, कु.धनश्री मत्रे, श्री भुषण निकम, श्री सुशांत जगताप,श्री आनंद डोळे, श्री सचिन डोळे, श्री संतोष कदम,श्री राकेश पवार, श्री विश्वनाथ विष्णू कदम, श्री. दत्तात्रय सलामवाडे, श्री सचिन तावडे,श्री सुमित हेळवाडकर,श्री केशव जगदाळे,श्री धनाजी जळणकर, श्री शिंदे सर,श्री मंगेश पाटील,श्री विकास आडे, श्री संदिप खरात सभासद मोहिमेत सहभागी होते.
संस्थेच्या वतीने गेली दोन तीन वर्षे अनेक वेळा गड संवर्धन मोहीम आयोजित करण्यात आल्या आहेत.

*दखल न्यूज भारत.*