उप पोलीस स्टेशन रेपणपली पोलिसांनी दिला अनाथ मुलींना हक्काचा निवारा

133

 

रमेश बामनकर//अहेरी तालुका प्रतिनिधी

अहेरी:- अहेरी तालुक्यातील उप पोलीस स्टेशन रेपणपली कडून मा.अंकित गोयल पोलीस अधीक्षक गडचिरोली,मा.मनीष कलवानीया अप्पर पोलिस अधीक्षक गडचिरोली यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक विश्वास शिंगाडे,पोलीस उप निरीक्षक विनोद अबुज, पांडुरंग हाके यांनी रेपणपली हद्दीतील मौजा छलेवाडा येथील पाच अनाथ व निराधार मुलींना सिमेंट व विटांचे पक्के घर बांधकाम करून देण्यात आले.
माहे.जानेवारी २०२१ मध्ये उप पोलिस स्टेशन रेपणपली पार्टीने अभियान दरम्यान छलेवाडा गावात भेट दिली व गावात ग्रामभेट घेउन गावकऱ्यांचे समस्या जाणून घेतले.त्यावेळी गावातील नागरीकांनी माहीती दिली की, तिरुपती पोचम दुर्गे यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले आहे.त्याचे पत्नीचे २०१३ मध्ये झाले असून त्यांच्या पश्चात जमुना दुर्गे, कावेरी दुर्गे, लक्ष्मी दुर्गे, अनुशा दुर्गे असे पाच मुली आहेत.
सदर मुलींचे घर मोडकळीस आले असून सद्या हलाकीचे जीवन व्यतीत करीत असून त्यांच्या घरामध्ये कोणतेही गृहउपयोगी साहित्य नसल्याबाबत पोलीस विभागाला कळविण्यात आले असता वरील वस्तुस्थिती निरीक्षण करून मदत करण्याची आस्वासन दिली
त्या अनुषंगाने सदर मुलींना पक्के घर व घरगूती साहित्य देण्याचे नियोजन करून या सतकार्यासाठी जिल्हा पोलिस, एसआरपीएफ,सिआरपीएफ,माडर्न कालेज पुणे, उडान फाउंडेशन अहेरी यांच्या मदतीने सदर अनाथ मुलींना सिमेंट व विटांचे दोन खोलीचे पक्का घर बांधकाम करून दिनांक ०१ एप्रिल२०२१ रोजी अनाथ मुलींचे हस्ते घराचे गृहप्रवेश करून करण्यात आले.
तसेच गृह उपयोगी साहित्य यामध्ये भांडी, कपडे, रेशन, ब्लॅंकेट, चादर इत्यादी साहित्य देण्यात आले.आणि मुलींचे उदरनिर्वाहा करीता संजय गांधी निराधार योजने अंतर्गत प्रस्ताव सादर करण्यात आले आहे.त्यामुळे सदर मुलींचे भविष्यातील उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होईल.
याबाबत अनाथ, निराधार मुलींनी उप पोलिस ठाणा रेपणपली चे कौतुक करून आभार मानले.