जिल्हाधिकारीच मुलांसमोर शिक्षक बनतात तेव्हा.! जिल्हाधिकारी संदीप कदम यांची पालावरची शाळेला भेट ; दिली एबीसीडी शिकवण

120

 

सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी भंडारा-ऋग्वेद येवले

साकोली : शहरातील पटमैदान येथे विमुक्त भटक्या बेलदार समाजाच्या पालावरची शाळेला (०२ एप्रिल) जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी भेट दिली व लहान मुलांसमोर एक शिक्षक बनीत एबीसीडी, गणित, भुमितीची फळ्यावर शिकवण दिली त्यावेळी जणू झाडाखालीच पालावरची शाळा भरली होती हे उल्लेखनिय.
भटके विमुक्त कल्याणकारी संस्था विदर्भ प्रदेश व विमुक्त भटक्या जाती बेलदार समाजाच्या संयुक्त विद्यमाने पालावरची शाळेचे निरीक्षण करण्यासाठी जिल्हाधिकारी संदीप कदम व चमुने भेट दिली. येथे जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी चक्क मुलांसमोर शिक्षकांची भुमिका बजावली व लहान विद्यार्थ्यांना शिकवण दिली. यात उपविभागीय अधिकारी मनिषा दांडगे, एसडीपीओ अरूण वालकर, तहसिलदार रमेश कुंभरे, पोलीस निरीक्षक जितेंद्र बोरकर व शासकीय चमु निरीक्षणास आली होती. बेलदार समाजाच्या पालावरची शाळेला आयोजन वि.भ.जाती. तालुका प्रमुख अर्जून सोनकुसरे, पदाधिकारी दिलीप चित्रीव, सुजित, श्रीकांत, राजेंद्र, महेंद्र, राहूल आवरकर, वस्तीप्रमुख घनश्याम बोकडे, तिलक सोनकुसरे, आकाश बोकडे, शिवा बोकडे, मनिष बोकडे, रोशन बोकडे, सिमल बोकडे, शिक्षक रश्मी बोकडे, भारत सोनकुसरे, मुन्ना लोखंडे, दिनेश बोकडे, कमल बोकडे व सर्व बेलदार समाजाचे महिला सदस्य हजर होते. कार्यक्रमात आभार अर्जून सोनकुसरे यांनी केले.