Home Breaking News गिट्टीचे भाव वाढविल्याने गरीब घर बांधणार कसे ?

गिट्टीचे भाव वाढविल्याने गरीब घर बांधणार कसे ?

272

मंदार बावनकर
केळवद शहर प्रतिनिधि

केळवद-सावनेर/नागपुर

स्टोन मेटल खदान मालकांची मनमानी.(काऴी गिट्टी)
ट्रान्सपोर्टर वर मोठे संकट, ईएमआय भरणार कसे.
सावनेर तालुक्यात ग्रामपंचायत जलाललखेडा, व सतरापुर
अंतर्गत काऴया गिट्टीच्या अंदाजे 16 खदानी अनेक वर्षा
पासुन सुरु आहेत. येथुन नागपुर जिल्हात व परिसरात गिट्टीची, मुरुमाची वाहतुक ट्रक व ट्रक्टर द्बारे केली जाते.
कोविड—19 च्या काऴात अचानक सर्व गिट्टीचे रेट खदान मालकांनी वाढविल्यामुऴे गरीब जनता आपले
घर बांधणार कसे हा प्रश्न निर्माण झालेला आहे. या संकटाच्या काऴात सरकार ने ट्रान्सपोर्टर मालकांना
तीन महिने ईएमआय न भरण्याचा दिलासा दिला, तर
दुसरीकडे सावनेर तालुक्यातील खदान मालकांनी रेट
कसे वाढविले? शासनाची परवाणगी घेतली काय कसा
प्रश्न वाहन मालकांनी व गरीब जनतेने केला आहे.
सावनेर तालुक्यात घरकुल योजनेतुन गरीब जनतेकरिता प्रधानमंत्री योजना, आदीवासी करिता शबरी योजना, अनुसुचित जाती करिता रमाई योजनेतुन अंदाजे आठशे
च्या जवऴपास घरकुलांना मजुरी मिऴाली आहे. या योजने अतंर्गत घर बांधकामाकरिता ₹1 लाख 20 हजार
मिऴतात. तसेच शेतक—यांच्या विहीरीचे अनेक कामांना
मंजुरी मिऴालेली आहे. 20 एमएम गिट्टी अगोदर खदान
वरुन 14 रुपए फुट मिऴत होती . ती आज 18 रुपए
फुट मिऴत आहे. आणी सोबतच रायल्टी सुध्दा दोन रुपए वाढविल्याचे ट्रक्टर, व ट्रक मालकांनी सांगितले.
घर बांधकाम करणा—या गरीब जनतेला रायल्टी पकडुन
दुप्पट रक्कम दयावी लागत आहे.या कोविड 19 च्या
काऴात ट्रान्सपोर्टर वर तसेच घर बांधकाम करणा—यावर मोठे संकट दिसुन येत आहे. खदान मालकांच्या
मनमानी कारभारावर आऴा कोण घालणार असा प्रश्न
सावनेर तालुक्यातील ट्रक व ट्रक्टर मालकांनी केला आहे.
सत्रापुर ग्रामपंचायत सचिव किरण वैष्णव यांच्याशी
संपर्क केला असता त्यांनी म्हटले की, ग्रामपंचायत कडुन अगोदर
खदानीचा टँक्स मिऴत होता, परंतु तीन वर्षापासुन मिऴने बंद झाला. ग्रामपंचायतला कोणताही फायदा
नाही.
*सावनेर माईन ओनर असोसीएशन अध्यक्ष— मंदार मंगऴे*
*यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी म्हटले की, डीझल वाढ झाली, मजुरी वाढली, तसेच अगोदर राँयल्टी बुक ₹30 हजार मधे मिऴत होते. यावेऴी राँयल्टी बुकाकरिता ₹1 लाख रुपए शासनाला दयावे लागत आहे. यामुऴे राँयल्टी व गिट्टीचे रेट वाढविले आहे.

सावनेर तहसीलदार -दीपक करांडे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी म्हटले की गिट्टी दर वाढवीने किवा कमी करने है खान मालकाच्या अखत्यारित येणारा विषय आहे त्यांनी शाषनाला वाहतूक राँयल्टी देणे अपेक्षित आहे

Previous articleपंढरीबापू देशमुख विद्यालय तथा कनिष्ठ कला व विद्यान महाविद्यालयाचा निकाल 95.23 टक्के महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ नागपूर विभागीय मंडळ नागपूर
Next articleरोजगार देणारे हात निर्माण करण्‍याचा संकल्‍प – आ. सुधीर मुनगंटीवार पोंभुर्णा येथे अगरबत्‍ती प्रकल्‍पाचा उदघाटन सोहळा संपन्‍न.