बेरोजगारांना स्वयं रोजगाराच्या संधीचा लाभ घ्या पिंपरी बुद्रुक येथे कार्यक्रमा प्रसंगी प्रितेशभैय्या भरणे यांचे उदगार.

दुसऱ्याच्या व्यवसायात काम करण्यापेक्षा आपण या योजनेचा लाभ घेऊन स्वतःचा व्यवसाय करावा कार्यक्रमाप्रसंगी प्रितेशभैय्या भरणे बोलत होते

141

 

नीरा नरसिंहपुर प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार.

पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथे बेरोजगारांना स्वयं रोजगाराच्या संधीचा  लाभ घेण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजने अंतर्गत कोणताही व्यवसाय करण्याचा लाभ घेण्यासाठी सर्व नागरिकांना व गोर गरिबांसाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. खासदार सुप्रियाताई सुळे  व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष हनुमंतराव कोकाटे, या सर्वांच्या प्रयत्नाने योजने अंतर्गत बेरोजगारांना स्वयंरोजगारा च्या संधीचा लाभ घेण्यासाठी व्यवसायाचे माहिती पत्रक देऊन अर्जाचे वाटप प्रितेशभैय्या भरणे यांच्या उपस्थितीत या वेळी  करण्यात आले. पिंपरी बुद्रुक येथील कार्यक्रमा प्रसंगी प्रितेशभैय्या पुढे म्हणाले की राज्यांमधील कोरोनाच्या काळात रोजगार नागरिकांचे गेले. नोकरी करीत असलेले जॉब गेले. स्वतःचे व्यवसाय गेले. आपला स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी रोजगाराची संधी मिळावी व आपणच स्वतःचे कौशल्य दाखवावे. दुसऱ्याच्या व्यवसायात काम करण्यापेक्षा आपण या योजनेमध्ये लाभ घेऊन स्वतःचा व्यवसाय करावा प्रितेशभैय्या भरणे यांचे उद्गार. यावेळी माजी आदर्श सरपंच श्रीकांत बोडके आपल्या प्रास्ताविक मध्ये बोलत असताना म्हणाले की महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री दत्ता मामा भरणे यांचे पिंपरी बुद्रुक गावावर नेहमीच प्रेम आणि विश्वास आहे. राज्यमंत्री भरणे मामांची मदत घेऊन पिंपरी बुद्रुक गावचा कायापालट केल्या शिवाय गप्प बसणार नाही या योजने अंतर्गत बेरोजगारांना स्वयं रोजगाराची संधी उपलब्ध करून घ्यावी. व कोणताही व्यवसाय सुरू करून सुखी जीवनासाठी प्रयत्न करावे. आदर्श माजी सरपंच श्रीकांत बोडके यांचे उद्गार.

या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती राज्यमंत्री दत्तात्रेय भरणेमामा यांचे (पुतणे) प्रितेशभैय्या भरणे, सचिन खामगर, सुहास कारंडे, विकी कांबळे, सागर पवार, माजी आदर्श  सरपंच श्रीकांत बोडके, विस्तार अधिकारी इनुस शेख, नरसिंहपूरचे उपसरपंच विठ्ठल देशमुख, तंटामुक्ती अध्यक्ष दशरथ राऊत, आदर्श ग्रामसेवक गणेश लंबाते, प्रशांत गायकवाड, बबनदादा बोडके, चांगदेव बोडके, नामदेव बोडके, बाळासाहेब घाडगे, संतोष सुतार, शहाजीअण्णा बोडके, सुदर्शन बोडके, रमेश मगर, प्रवीण बोडके, बाप्पा मगर, आशोक बोडके, गोविंद सुळ, नाथा रुपनवर, वर्धमान बोडके, राजेंद्र लावंड, शशिकांत सूर्यवंशी, जगुमामा मोहिते, हे सर्वच मान्यवर उपस्थित राहून यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी आदर्श सरपंच श्रीकांत बोडके यांनी केले तर सूत्रसंचालन महेश सुतार व शेवटी आभार प्रदर्शन आदर्श ग्रामसेवक गणेश लंबाते यांनी मानले.

———————————————————–

फोटो:- ओळी–

पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथे कार्यक्रमा प्रसंगी मार्गदर्शन करीत आसताना प्रितेश भैय्या भरणे.

फोटो:- ओळी- कार्यक्रमाप्रसंगी मार्गदर्शन करीत असताना माजी आदर्श सरपंच श्रीकांत बोडके.

Balasaheb Sutar
Reporter
Mob.9850628160