डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हिडिओ सूनेच्या अकाउंटवरून शेअर केला; फेसबुकने तो सुद्धा काढून टाकला!

102

 

हर्ष साखरे दखल न्युज भारत

अमेरिका:- अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे प्रदान करण्यापूर्वीच राजधानी कॅपिटल हिल्स येथे सहा जानेवारी रोजी झालेल्या हिंसाचारानंतर माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मनी बंदी घातली. त्यामुळे काहीही ट्विट करून, फेसबुकवर पोस्ट करणाऱ्या ट्रम्प यांची कोंडी झाली होती. मात्र, अलिकडे पायउतार झाल्यानंतरही ट्रम्प चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी कधी लग्नाच्या रिसेप्शनमध्ये तर कधी अन्य लहान मोठ्या कार्यक्रमात जाऊन बोलत असतात. आतात तर त्यांनी चक्क सुनेच्या फेसबुक पेजवरुन आपल्या फॉलोअर्सची संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, फेसबुकने तो व्हिडिओही काढून टाकला आहे.

सून लारा ट्रम्पच्या फेसबुक पेजवर ट्रम्प यांनी व्हिडिओ पोस्ट केला होता. मात्र फेसबुकने हा व्हिडिओ काढून टाकला आहे. लारा ट्रम्प यांच्या पेजवरुन डोनाल्ड ट्रम्प यांना साक्षात्कार झाल्याचा व्हिडिओ पोस्ट केला होता. लारा यांनीच त्यांची मुलाखत घेतली होती. काही वेळातच फेसबुकने हा व्हिडिओ काढून टाकल्याचा मेल लारा यांना केला. या व्हिडीओत ट्रम्प यांचा आवाज असल्याने व्हिडीओ काढून टाकत आहोत असं कंपनीने लारा यांना कळविले. फेसबुकने हा व्हिडिओ काढून टाकत असल्याचा मेल केला होता.

लारा यांनी या ईमेलचा स्क्रीनशॉर्ट शेअर केला आहे. यामध्ये फेसबुकने लारा यांना दिलेल्या इशाऱ्यात म्हटले आहे, ‘आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की आम्ही लारा ट्रम्प यांच्या फेसबुक पेजवरुन ती पोस्ट काढून टाकली आहे ज्यामध्ये माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा आवाज आहे. आम्ही ट्रम्प यांचं फेसबुक तसेच इन्स्टाग्राम खातं बंद केलं आहे. या पुढेही आम्ही ट्रम्प यांचा आवाज असणारे व्हिडिओ काढून टाकण्याची कारवाई सुरु ठेऊ,’