चार दिवसांपासून कृषी पंपाची विस्कळीत झालेली विज सुरळीत करा अन्यथा महावितरणच्या अधिकाऱ्यांना घेराव घालु गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम याच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा प्रशासनाला इशारा

257

देवानंद जांभूळकर जिल्हा प्रतिनिधी
जोगीसाखरा- परीसरातील शेतक-यांच्या कृषी पंपाचा विज पुरवठा गेल्या चार दिवसांपासून विस्कळीत झाल्याने शेतकरी वर्ग हवालदिल होऊन धान पिक पाण्या अभावी सुकले असल्यामुळे आरमोरी तालुक्यासह परीसरातील शेतकऱ्यांच्या कृषी पपाची विज विस्कळीत झालेली विज सुरळीत करा अन्यथा विज महावितरण च्या अधिकाऱ्यांना दि ५एफ्रिलला घेराव घालु अशा इशाराच गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम याच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिला आहे.

कोरोना विषाणुमुळे देशासह राज्यभरात लाॅकडाउन करण्यात आले होते. या कालावधीत अर्थव्यवस्था ठप्प झालेली होती. छोटया मोठया व्यावसायिकांसह शेतक-यांनाही मोठया प्रमाणात आर्थीक फटका बसला. लाॅकडाउन, अतिवृष्टी या समस्यांनी जर्जर झालेल्या बळीराजाची उन्हाळी धान मका पिकांमुळे आर्थीक विवंचना कमी होईल असे वाटत असतांनाच महावितरणने गेल्या चार दिवसांपासून कृषी पंपाचा वीज पुरवठा वारंवार विस्कळीत झाल्याने पिकेही हातची जाउन मोठा आर्थीक भुर्दंड सोसावा लागणार आहे.
कोरोना, लाॅकडाउन, नैसर्गिक आपत्ती अशा विविध बाजुने घेरल्या गेलेल्या शेतक-यांची पदरी गेल्या वर्षीही निराशा आली. खरीपाचे पिके वाया गेल्याने ते उभे करण्यासाठी घेतलेले कर्जही फिटले नाही. त्यामुळे यावर्षी जोगी साखरा शंकरनगर रामपुर कासवी सालमारा आष्टा अंतरजी पळसगाव येथील शेतकऱ्यांनी नदि नाले.जमिनीवर बोरवेल विहीर यामध्ये पाणी साठा निर्माण करुण उत्पन्नात वाढ व्हावी या उद्देशाने महागडी धान मका ईतर बिजाई खत औषधी घेऊन मोठ्या प्रमाणात धान मका पिक घेतले परंतु गेल्या चार दिवसांपासून कृषी पंपाची विज पुणता विस्कळीत होऊन शेतीतील धान पाण्या अभावी सुकले पहीलेच धान पिक रोवनीला शेतकऱ्यांनी उसनवार व्याजाने कर्ज कडुन पिके लावली असताना पाण्या अभावी जमीनीला भेगा पडल्या तसेच शेतकऱ्यांचे वारंवार विजेच्या कमी-जास्त दाबामुळे कृषी पंप जळुन अधिकच शेतकऱ्यांच्या नुकसानीत भर पडली आहे. उन्हाळी धान पिक हे जातीत जास्त खालच्या पाण्यावर अवलंबून असुन सेवटच्या एफ्रिल मे महिन्यात जास्त पाण्याची गरज असते परंतु याच महिन्यात विज विस्कळीत झाल्यामुळे शेतक-यांपुढे आणखी मोठे संकट उभे राहिले आहे. या समधी वारंवार विजेची समस्या विज वितरणाचा अधिकाऱ्यांच्या लक्षात आणुन दिली असतांनाही दखल न घेता उलट शेतकऱ्यांच्या कर्जात बुडविण्याचे काम सुरू असल्याने तात्काळ जोगी साखरा परीसरासह आरमोरी तालुक्यातील विस्कळीत झालेली कृषी पंपाची विज सुरळीत करा अन्यथा दि ५ एफ्रिलला आरमोरी येथील विज महावितरण च्या अधिकाऱ्यांना घेराव घालु अशा इशाराच गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम याच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिला आहे.
यावेळी कितीलाल गरफडे देवनाथ झलके कांतीलाल गरफडे भावराव मडावी प्रदिप सडमाके मच्छीद्र मेश्राम जयद्र पेन्दाम भेयाजी कन्नाके सुनिल कुमरे नरेंद्र गजभिये गोपाल नारनवरे यासह शेतकरी उपस्थित होते.