बल्लारपुर गांधी वार्डतुन चोरी गेलेली सायकल इंजि. राकेश सोमानी ने शोधुन दिली

123

 

दख़ल न्यूज़ भारत : शंकर महाकाली

 

बल्लारपुर: बल्लारपूर शहरातील गांधी वॉर्ड येथुन एक तीन चाकी सायकल चोरी गेली सायकल एका दिवसात मालकाच्या ताब्यात देण्यात गांधी वॉर्ड येथील इंजि. राकेश सोमानी यांना यश आले आहे. त्यामुळे यांच्या कर्तव्यतत्परतेबद्दल सर्व सामान्य जनतेतून यांचं अभिनंदन होत आहे.
सविस्तर असे की बल्लारपूर येथील तीन चाकी सायकल चालक अशोक हे नेहमी प्रमाणे आपले काम करून रात्रौ घरी आले नेहमी च्या ठिकाणी त्यांनी सायकल लावली व झोपले त्याच रात्री १ वाजता काही चोरांनी गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. काही वेळ शोधाशोध करून काही उपयोग होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी इंजि. राकेश सोमानी यांना सांगितले.
यावरून सोमानी जी व त्यांच्या समाज सेवा करणाऱ्या मित्रांच्या सहारे सायकल शोधून काढण्यात यश आले व त्यांनी ती सायकल ,सायकल मालकाच्या हवाले केले.सायकल मालकांनी राकेश चे खूप खूप आभार केले,व आज ही माणुसकी जिवंत आहे अश्या शब्दात त्यांचे कौतुक केले.