जल जीवन मिशन अंतर्गत ठाकरी येथे नळ जोडणीचा शुभारंभ

127

 

प्रतिनिधी प्रविण तिवाडे

ग्रामपंचायत ठाकरी येथे जल जीवन मिशन अंतर्गत प्रत्येक घरी नळ जोडणीचा शुभारंभ करण्यात आला
जिल्हा परिषद सदस्य रुपाली पंदिलवार गडचिरोली यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती प.स.सदस्य शंकर आक्रेड्डीवार चामोर्शी, सरपंच नंदा दादाजी कुळसंगे ग्रा. पं. ठाकरी, सदस्य वनिता नागूलवार सचिव इंद्रावन बारसागडे ग्रा. पं. ठाकरी,तमुस अध्यक्ष राजू माडेमवार उपस्थित होते.
ग्रामपंचायत ठाकरी येथे जल जीवन मिशन अंतर्गत ३५० लोकांना नळ कनेक्शन देण्याचे उद्दीष्ट देण्यात आले असून पुढील महिन्यात पूर्ण करायचे आहे असे सांगण्यात आले.