जय महाराष्ट्र चालक मालक संघटनेच्या वतीने पाणपोई सुरू

150

कुरखेडा
राजे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्य येथील जयमहाराष्ट्र चालक मालक संघटनेच्या वतीने शिवसेना संपर्क कार्यालयाचे जवळ पाणपोई सुरू करण्यात आली
सदर कार्यालय जवळून कोर्ची,मालेवाडा,पुराडा कढोली धानोरा केसोरी कडे जाणार्या प्रवास्यांना पिण्याचे पाणी करिता शोधा शोध करावी लागत असे. तहानलेला प्रवास्यांना पिण्याचे थंड पाणी ऊपलब्ध करुन देत मानुसकी जोपासण्या चे कार्य जय महाराष्ट्र चालक मालक संघटनेच्या वतीने झाल्याने त्यांच्या कार्याचे स्थानिक पातळीवर अभिनंदन होत आहे.
पाणपोईचे उदघाटन शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रथम नगराध्यक्ष डॉ महेंद्रकुमार मोहबंसी, माजी नगरसेवक पुंडलिक देशमुख,पुरुषोत्तम मडावी,बंडुभाऊ लांजेवार,संजय देशमुख ,विजय राठी,दिनेश किरंगे, लक्ष्मण मेश्राम, हेमंत चंदनखेडे,सदानंद पोटेकर, तुळशीदास गजभिये,गजू ठाकरे, सुनील नेवारे व इतर चालक मालक यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.