पंढरीबापू देशमुख विद्यालय तथा कनिष्ठ कला व विद्यान महाविद्यालयाचा निकाल 95.23 टक्के महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ नागपूर विभागीय मंडळ नागपूर

0
195

 

प्रतिनिधी
राहुल उके

महागाव:- दि.29जुलै 2020
आज नुकताच महाराष्ट्र राज्य मंडळाने 10 वीचा निकाल जाहीर केला त्यामध्ये पंढरीबापू देशमुख विद्यालय तथा कनिष्ठ कला व विद्यान महाविद्यालयाचा निकाल 95 .23 टक्के लागलेला आहे. परीक्षेसाठी एकूण 126 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 120विद्यार्थी पास झाले.
प्राविण्य श्रेणी मध्ये 33 विद्यार्थी तर 66 विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर 19 विद्यार्थी द्वितीय तर 02 तृतीय श्रेणीतउत्तीर्ण झाले आहेत. यामधे प्रथम कु. आदिती विनोद रामटेके 91.20 टक्के तर फाल्गुनी निताराम गायकवाड 88.20 टक्के द्वितीय तर कु. वैष्णवी विनोद गहाणे ही 87 टक्के घेऊन तृतीय तसेच निखिल गणेश रुकमोडे 86 टक्के गुण घेऊन चतुर्थ आले आहेत. तसेच करण पंढरी आकरे 85.20टक्के घेऊन पाचवा क्रमांकावर आले.

सर्व प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचे गुणवंत विद्यार्थ्यांचे आणि पास झालेल्या विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा
प्राचार्य
श्री. वाय. एस. परशुरामकर सर

तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून उज्वल भविष्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आईवडील व शाळेतील गुरुजन वर्गांना दिले आहे.