शेवटी!…… 14 वर्षांच्या प्रेमाचा झाला थरारक अंत

571

 

हर्ष साखरे विभागीय प्रतिनिधी

पुणे:- चौदा वर्षांपासून प्रेमसंबंध असूनसुद्धा लग्न करण्यासाठी आपल्या प्रेयसीने नकार दिल्याने प्रियकराने आपल्या प्रेयसीचा खून केल्याची भयानक घटना घडली आहे. मनीषा गेडाम असं मृत मुलीचं नाव असून पुण्यात ही धक्कादायक घटना घडली.

14 वर्षांपासून प्रेम असल्याने आपण शेवटचं भेटुयात असं बोलून भेटण्याच्या बहाण्याने या प्रियकराने मनीषाला बोलावून घेतले होते. खून केल्यानंतर तब्बल 17 दिवसांनी हा खून केल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर चंदन नगर पोलिसांनी लगेच छडा लावत या प्रकरणी आरोपीला अटक केली असून सागर गुडाव असं आरोपी प्रियकराचं नाव आहे.

“शेवटचं भेटू आणि थांबू..”

मिळालेल्या माहितीच्या आधारे मनीषा आणि सागर हे दोघे जण अमरावती येथील रहिवासी आहेत. मागील 14 वर्षांपासून त्यांच्यात प्रेम होते. वारंवार होत असलेल्या कुटुंबियांच्या विरोधामुळे मनीषा सागरशी लग्न करण्यासाठी नकार देत होती.

14 वर्षांपासून असलेल्या या प्रेम संबंधामुळे, नकार देत असल्याने मनीषाचा प्रियकर तिला सातत्याने फोन करायचा. कधी कधी सागरच्या फोनलासुद्धा ती प्रतिसाद देत नव्हती. अखेर भेट ठरता ठरता ठरली आणि दरम्यान तुला शेवटचे भेटायचे आहे असे सांगून सागरने मनीषाला 13 मार्च रोजी भेटायला बोलावलं.

यावेळी दोघेही दुचाकीवरुन फिरण्यासाठी बाहेर पडले आणि भाटघर धरणाच्या दिशेने गेला. त्या ठिकाणी गेल्यावर मनीषा बेसावध असताना तिच्या डोक्यात दगड घालून तिचा खून केला. त्यानंतर सागर घटनास्थळावरून फरार झाला होता पण आता आरोपी सागर गुडावला अटक केली असून पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत. सदर प्रकरणाचा अधिक तपास आता पोलिस करत आहेत.