विजेच्या लपंडाव मुळे शेतकरी त्रस्त पिकांना पाणी पुरविण्याकरिता रात्रभर करावं लागते जागरण

332

 

ऋषी सहारे
संपादक

शेतकरी जगला तर देश जगेल
पण निव्वळ स्लोगन लावून किंवा बोलून भागणार नाही तर ते कृतीत असायला पाहिजे.
गडचिरोली जिल्ह्यात मोठया प्रमाणावर धान पिक घेतल्या जाते, आता धानाचा डबल फसलचा हंगाम असल्याने शेतकरी बांधवांनी धान पिकाची लागवड केली आहे,
आरमोरी तालुक्यात पाण्याच्या सुविधेचा अभाव असल्याने डोंगरगाव (भु) येथिल शेतकरी बांधवांनी स्वतःच्या शेतात विहिरी खोदून विहिरवर धानपिकाला पाणी देण्यासाठी विजपम्प लावून पाण्याची सोय केलेली आहे परंतु डोंगरगाव व आजूबाजूच्या परिसरातील वीजपुरवठा दिवसा तर कधी रात्री अधामधात केव्हाही खंडित होऊन 3-4 तास वीजपुरवठा बंद राहत असल्याने विहीरीवर विजपम्प बसवून सुद्धा धानपिकाला पाणीपुरवठा बरोबर होत नाही त्यामुळे धान पीक धोक्यात आले आहे, या विजेच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना रात्री अपरात्री केव्हाही जागरण करून धान पिकाला पाणी देण्यासाठी कसरत करावे लागत आहे ,
त्यामुळे MSEB ने शेतकरी वर्गाचा विचार करून वेळोवेळी खंडित होणारा वीजपुरवठा नियमितपणे सुरळीत चालू ठेवावा अशी मागणी प्रहारचे निखील धार्मिक यांनी पत्रकाच्या माध्यमातून केली आहे.