अमरावती जिल्ह्यात दहावीचा निकाल 93.94%,निकालात धारणी तालुका अव्वल, तर चिखलदऱ्याची माघार

अमरावती(उपजिल्हा प्रतिनिधी, युवराज डोंगरे)
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल आज दुपारी एक वाजता जाहीर झाला असून अमरावती जिल्ह्याचा निकाल हा 93.94%लागला असून निकालात धारणी तालुक्याने बाजी मारली असून चिखलदरा तालुका माघारला आहे
अमरावती जिल्ह्यातील तालुका टक्केवारी अमरावती तालुका 95.21%,दर्यापूर तालुका 94.90%,भातकुली तालुका 93.44%,नांदगाव खंडेश्वर तालुका 93.28%,चांदुर रेल्वे तालुका 94.14%,धामणगाव रेल्वे तालुका 94.57%,तिवसा तालुका 89.89%,मोर्शी तालुका 91.91%,वरुड तालुका 92.66,चांदुरबाजार तालुका 95.51%,अचलपूर तालुका 93.57%,अंजगगाव तालुका 93.77%धारणी तालुका 96.13% चिखलदरा तालुका 89.11% एवढा निकाल लागला आहे
अमरावती जिल्ह्यातून 1 लाख 95 हजार 29 मुले दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाले असून 1 लाख 89 हजार 92 मुली शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत अमरावती जिल्ह्यात 13 कॉपीबहाद्दरांवर कारवाई करण्यात आली आहे
—————————————-
174 शाळांचा निकाल 100टक्के
—————————————-
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत अमरावती जिल्ह्यातील 174 शाळांचा निकाल हा 100 %लागला असून अमरावती विभागात शाळांची संख्या एकूण 2617आहे
—————————————-
61कॉपीबहाद्दरांवर कारवाई
———————————-
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षेत गैरमार्गाचा अवलंब केल्याने अमरावती विभागात एकूण 61 कॉपीबहाद्दरांवर कारवाई करण्यात आली त्यापैकी अकोला 7 अमरावती 13 बुलढाणा 8 यवतमाळ 7 वाशिम 26 जणांचा समावेश आहे