बावणे कुणबी समाजातर्फे संतश्रेष्ठ जगतगुरु संत तुकाराम महाराज बीज व छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

48

 

देवानंद जांभूळकर जिल्हा प्रतिनिधी

आरमोरी:- बावणे कुणबी समाजा तर्फे संत तुकाराम महाराज बिज कार्यक्रम व शिवाजी महाराज जयंती हा एकत्र सोहळा आरमोरी बर्डी येथील दत्त मंदिर सभागृहात घेण्यात आला.हा गुरु शिष्यांचा आगळा वेगळा सोहळा बावणे कुणबी बांधवांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला .संत तुकाराम महाराज व शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून सोहळ्याची सुरुवात झाली .
बावणे कुणबी समाज मंडळ आरमोरी चे अध्यक्ष श्री बंडूभाऊ डोकरे यांच्या अध्यक्षतेखाली व लक्ष्मी बाई मने , महेंद्र शेंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मंगलमय सोहळा संपन्न झाला .
उपरोक्त कार्यक्रमाला गोलूभाऊ भोयर , मुनेश्वरजी शेलोकर , संतोषजी मने , कल्पनाबाई तिजारे , शंकर बोरकर यांनी संत तुकाराम महाराज व व शिवाजी महाराज यांच्या जीवनप्रसंगावर सखोल मार्गदर्शन करुंन समाजाच्या उन्नती साठी व एकसंघतेसाठी काय प्रयत्न केले जातील यावरही उदबोधन केले .गोलूभाऊ भोयर , ग्राम पंचायत वघाळा येथील बावणे कुणबी समजतील एकमेव सदस्य निवड झाल्याने तसेच कल्पनाताई तिजारे यांची जिल्हा विकास व नियोजन समिती मध्ये नियुक्ती झाल्याने या दोन्ही समाज सदश्याचे पुष्पहाराने स्वागत करून समाजातर्फे अभिनंदन करण्यात आले .
सदर कार्यक्रमास बावणे कुणबी समाजातील बहुसंख्य महिला व पुरुष उपस्थित होते .कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्रीमती लक्ष्मीबाई मने यांनी तर संचलन श्री महेंद्र शेंडे वउपस्थितांचे आभार अंकुशजी गाढवे सचिव बावणे कुणबी समाज मंडळ आरमोरी यांनी मानले .कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मिथुन वसंत शेबे , आशिष मने , विजयभाऊ गोंदोळे , चेतन भोयर , रोशन मने , सौ संध्या टिचकुले , सौ रत्नाबाई बोरकर , स्नेहल शेंडे , डिण्कु गोंदोळे ईत्यादि समाज बांधवांनी सहकार्य केले .