कोंढवे धावडे येथे शिवजयंती निमित्त आयोजित रक्तदान शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद,संतोष शेलार शिवसैनिक.

42

अतुल पवळे पुणे जिल्हा प्रतिनिधी.
कोंढवे धावडे येथे दरवर्षी तिथीप्रमाणे उत्साहात शिवजयंती साजरी केली जाते व भव्य मिरवणूक काढण्यात येते. श्रीमंत भैरवनाथ तालीम संघ शिवजयंती महोत्सवाचे हे नववे वर्ष आहे. कोरोनाचे पार्श्वभूमीवर सरकारने सार्वजनिक कार्यक्रमांवर बंधने घातली आहेत. त्यामुळे यावर्षी मंडळाने महोत्सव रद्द करून साधेपणाने पूजन केले. सर्व रुग्णालयांत रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. सामाजिक बांधीलकी म्हणून श्रीमंत भैरवनाथ तालीम संघाने आचार्य आनंद ऋषीजी रक्तपेढीच्या मदतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले. या शिबिरात 80 पेक्षा जास्त लोकांनी रक्तदान केले.श्रीमंत भैरवनाथ तालीम संघाचे आधारस्तंभ वसंत लोले, अध्यक्ष अमोल मोकाशी, उपाध्यक्ष अमोल परांडे, शिवसेना खडकवासला विधानसभा प्रमुख नितीन वाघ, हवेली तालुका प्रमुख संतोष शेलार, पप्पूदादा शेलार, राजाभाऊ जावळकर, अक्षय मांडगे, अक्षय जावळकर, अमित जमादार, अमोल गुंजाळ, राजाभाऊ मांडगे,चेतन बोडके,निघील शितोळे,रोशन चातुरकर,प्रिंन्स सिंग,उमेश यादव,व सर्व पदाधिकारी व सर्व शिवभक्त उपस्थित होते.