सचिन श्यामकुंवर तालुका प्रतिनिधी
दखल न्यूज भारत..।।
आमगांव.एस.एस.सी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला त्यात आमगांव तालुक्यातुन प्रथम द्वितीय व तृतीय पटकावून मुलींनी बाजी मारली. विद्या निकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आमगाव येथील कु. आकांक्षा पटले हिने 96.20 टक्के घेऊन तालुक्यातुन प्रथम येण्याचा मान पटकावला. तर आदर्श महाविद्यालय आमगाव येथील कु.प्रियांशी हौमेन्द पटले हिने 95.80 टक्के घेऊन तालुक्यात द्वितीय येणेचा मान पटकावला.तर कु.साक्षी असाटी 95.20 टक्के घेऊन तृतीय स्थान पटकावला..आमगांव येथील विद्यानिकेतन शाळेचा निकाल 97.84%.. आदर्श विद्यालय शाळेचा 95.86%.. सरस्वती विद्यालय 96.20%.. अमूताबेन विद्यालय 94.02%.. जिल्हा परिषद विद्यालय 80.59%.. टक्के निकालघेऊन सूयश प्राप्त केले..